तीन कंत्राटी ग्रामसेवकाकडे ६३ ग्रा.पं.चा कार्यभार
By Admin | Updated: July 8, 2014 23:37 IST2014-07-08T23:37:25+5:302014-07-08T23:37:25+5:30
ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. याकाळात सेलू तालुक्यातील तीन कंत्राटी ग्रामसेवकांकडे ६३ ग्रामपंचायतीचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. यामुळे नागरिकांची अनेक कामे खोळंबली असून

तीन कंत्राटी ग्रामसेवकाकडे ६३ ग्रा.पं.चा कार्यभार
घोराड : ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. याकाळात सेलू तालुक्यातील तीन कंत्राटी ग्रामसेवकांकडे ६३ ग्रामपंचायतीचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. यामुळे नागरिकांची अनेक कामे खोळंबली असून ऐन महाविद्यालयीन प्रवेशाच्या काळात विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र व दाखल्याकरिता भटकंती करावी लागणार आहे. ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे हा कार्यभार कंत्राटी ग्रामसेवकाकडे सोपविण्यात येत असला तरी यामुळे प्रशासकीय ओढाताण होणार आहे.
याबाबत ७ जुलैला गटविकास अधिकारी यांनी काढलेल्या क्रापंससे , पंचायत, स्था, कावि- ११४२/२०१४ च्या ग्राम विकास जलसंधारण विभागाचे पत्र प्रकाशित करण्यात आले. यानुसार आंदोलनामुळे ग्रामपंचायतीची दैनंदिन कामे खोळंबली आहे. त्यामुळे दाखले प्रमाणपत्रे तसेच ग्रामपंचायतीचे अत्यावश्यक कामासाठी तीन कंत्राटी ग्रामसेवक याच्याकडे कार्यभार देण्यात येत आहे. संबंधित ग्रामपंचायतीच्या चाव्या व रबरी शिक्के घेवून दिलेले कार्य करावे. संप कालावधीत पंचायत समिती सेलू येथे राहून सदर कार्य करावयाचे आहे, असे नमुद आहे. या पत्रकानुसार तीन कंत्राटी ग्रामसेवकात डी. एस. लांजेवार यांच्याकडे आकोली, आमगाव(म), अंतरगाव, बाभुळगाव, बोरी (को), बोरखडी (क), गरमसुर, गिरोली, हिंगणी, जामणी, खैरी, क्षीरसमुद्र, रेहकी, नानबर्डी, रिधोरा, सालई (कला) सालई (पेवठ) सोंडी, सुकळी (बाई), वडगाव (कला) वडगाव (खुर्द), वडगाव (जं) येळाकेळी, झडशी या गावांचा प्रभार आहे.
तसेच एस. एच. सिर्सीकर यांच्याकडे बोंडसुला, आमगाव (ख), आलगाव, चानकी, चारमंडळ, दहेगाव, देऊळगाव, दिग्रस, दिंदोंडा, हमदापूर, हेलोडी, केळझर, खापरी (ढो), खापरी (शि.), पळसगाव (बाई) पिंपळगाव, टाकळी (कि़) वघाळा सुरगाव, तळोदी या गावांचा कार्यभार आहे. एस. एस. लंगडे यांच्याकडे जयपुर, जूनगड, जुनोना, कान्हापूर, खडका, कोपरा, कोटंबा, महाबळा, मोई, नवरगाव, रमणा, सेलू, सुकळी (स्टे), वाहितपुर, घोराड ही गावे सोपविण्यात आली आहे.
या आदेशातील प्रत पंचायत समिती कार्यालयात भिंतीवर चिपकवून प्रकाशित करण्यात आली आहे. सदर ग्रामसेवकाचे मोबाईल नंबर दिले असून गरजू ग्रामस्थांना मोबाईलवर किंवा पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधावा लागणार आहे; पण पंचायत समितीने ग्रामस्थांची अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला असला तरी या कार्यक्षेत्रातील गावे २५ ते ३० किमी परिसरात येत असल्याने ग्रामस्थांना अडचणीचे ठरू पाहत आहे. या कामबंद आंदोलनात सेलू पंचायत समिती अंतर्गत ६३ ग्रामपंचायतींपैकी ५७ ग्रा.पं. चे ३६ ग्रामसेवक सामील आहेत. यात लांबट, लोखंडे, पी.व्ही. पवार, किर्ती राऊत, सी.एस. देशमुख, एस.एफ. डोंगरे, जे.डी. राठोड, एस. पी. राऊत, ए.एस. श्रीवास्तव, शुभांगी बोळे, सडमाके, गावंडे, वाटकर, कानतोडे, गुडवार, गुजरकर, चिंंचमलातपुरे, दासलवार, चव्हाण, करपाते, पुसनायके, नागपूरकर, खराबे, कोटंबकर, वैरागडे, नव्हाळे, सपकाळ, माहुरे, शहारे, उमाटे, शेटे आदींचा समावेश आहे.(वार्ताहर)