राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सेवाग्रामला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 16:37 IST2020-07-26T16:35:29+5:302020-07-26T16:37:40+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचे विचार आजही पे्ररणादायक आहेत. मात्र, त्यांचे विचार जपणारे कमी आहेत, अशी खंत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली.

Governor Bhagat Singh Koshyari's visit to Sevagram | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सेवाग्रामला भेट

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सेवाग्रामला भेट

ठळक मुद्देगांधी-विनोबांचे विचार जपणारे कमीचगांधी आश्रमात घालवला दीड तास

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: सेवाग्राम येथील गांधी आश्रमाला भेट देण्याची अनेक वर्षांपासून इच्छा होती. ती आज पूर्ण झाली. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचे विचार आजही पे्ररणादायक आहेत. मात्र, त्यांचे विचार जपणारे कमी आहेत, अशी खंत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी रविवारी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी सेवाग्राम येथील गांधी आश्रमात सुमारे दीड तास घालविला. यावेळी त्यांनी सेवाग्राम आश्रमात जेवणाचा आस्वाद घेतला. शिवाय खादीच्या कापडाची खरेदी केली. तसेच आश्रमाच्या भेट वहीत आपला अभिप्राय नोंदविला.

Web Title: Governor Bhagat Singh Koshyari's visit to Sevagram