शासनाने सारथी संस्थेची स्वायत्तता पूर्ववत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:00 IST2020-01-09T05:00:00+5:302020-01-09T05:00:30+5:30
२१ नोव्हेंबर २०१९ च्या आदेशानुसार वेतनेत्तर खर्चास मनाई केली आहे. यामुळे प्रशिक्षण घेत असलेल्या असंख्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणे बंद झाले आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेत इमाव खात्याने जबाबदारी घेण्यास टोलवाटोलवी केल्याने राज्यातील एसबीसी व ईबीसीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता अद्याप मिळाला नाही. दरवर्षी या निधीची तरतूद मे महिन्यातच करावी. कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

शासनाने सारथी संस्थेची स्वायत्तता पूर्ववत करावी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मराठा कुणबी समाजासाठी १० महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या सारथी संस्थेची स्वायत्तता पूर्ववत करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वर्धा जिल्हा शाखेच्यावतीने करण्यात आली आहे. यामागणीचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
२१ नोव्हेंबर २०१९ च्या आदेशानुसार वेतनेत्तर खर्चास मनाई केली आहे. यामुळे प्रशिक्षण घेत असलेल्या असंख्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणे बंद झाले आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेत इमाव खात्याने जबाबदारी घेण्यास टोलवाटोलवी केल्याने राज्यातील एसबीसी व ईबीसीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता अद्याप मिळाला नाही. दरवर्षी या निधीची तरतूद मे महिन्यातच करावी. कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. हा निकाल त्वरीत लागण्यासाठी प्रयत्न करावे. मराठा आरक्षण याचिकेवर २२ जानेवारी २०२० पासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होणार आहे. यासाठी योग्य तयारी करणाºया निष्णात ज्येष्ठ वकीलाची नेमणूक करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदन देताना अ.भा.मराठा महासंघाचे अॅड. अभय शिंदे, तुकाराम पवार, किशोर धांदे, पी.व्ही.वानखडे, डॉ.अभय शिंदे, जयंत भालेराव, नंदू होणाडे,अॅड.अरुण येवले, सुधीर गिºहे, राजु वानखेडे, सुधीर पांगूळ, अरविंद धोपट आदींची उपस्थिती होती.