सरकारने शेतीची नीती बदलविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST2020-01-14T05:00:00+5:302020-01-14T05:00:17+5:30
नयी तालिम समिती परिसरातील शांती भवन मध्ये राष्ट्रीय युवा संघटनेचे राज्य स्तरीय शिबिर सुरू आहे. पहिल्या सत्रात शेती व शेतकऱ्यांवर कार्य करणारे विवेकानंद माथने यांनी ‘शेतकºयांची शेती व दुर्दशा’ यावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी सत्यप्रकाश भारत उपस्थित होते. पुढे बोलताना विवेकानंद माथने म्हणाले, दरवर्षी दहा ते बारा हजार शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

सरकारने शेतीची नीती बदलविण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : नैसर्गिक संपत्ती व मानवाचे श्रम यांच्या एकत्रिपणाने जगातील संपत्ती निर्माण होत असते. शेती उत्पादने जगण्याचे आणि अत्यावश्यक साधने असल्याने देशाने त्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. शेती करणारा आत्महत्या करीत आहेत पण; कुटुंब मात्र उद्धवस्त होते. शेतकऱ्यांना पिकांचा योग्य हमीभाव दिल्या जात नाही. शेती आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावयाची असेल तर सरकारने शेतीची नीती बदलणे आवश्यक आहे, असे मत विवेकानंद माथने यांनी व्यक्त केले.
नयी तालिम समिती परिसरातील शांती भवन मध्ये राष्ट्रीय युवा संघटनेचे राज्य स्तरीय शिबिर सुरू आहे. पहिल्या सत्रात शेती व शेतकऱ्यांवर कार्य करणारे विवेकानंद माथने यांनी ‘शेतकºयांची शेती व दुर्दशा’ यावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी सत्यप्रकाश भारत उपस्थित होते. पुढे बोलताना विवेकानंद माथने म्हणाले, दरवर्षी दहा ते बारा हजार शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ज्यांच्या नावे शेती आहे त्यांचीच नोंदणी होत आहे पण; त्यांचे कुटुंबही आत्महत्या करते. तेव्हा ही संख्या साठ हजारावर जाते. आज अकुशल मजुरांची मजुरी निश्चित आहे पण; शेतकºयांची नाही. हिशेब काढला तर ती ९२ रुपये रोज इतके पडते. यात एकटा माणूसही व्यवस्थित जगू शकत नाहीत. विकासासाठी औद्योगिकीकरण सुरू करण्यात आले. मात्र यातुनही शोषण वाढतच असून ते निरंतर होत राहणार. एवढेच नाही तर या औद्योगिकीकरणामुळे रोजगारही कमी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे अती औद्योगिकीकरणही मारक ठरत असल्याचे माथने म्हणाले. आजची परिस्थिती पाहता स्वदेशीचा स्विकार करावा लागेल. समान न्याय, समान कायदे, श्रमावर आधारीत मूल्य या तीन गोष्टींची मागणी शासनाकडे सर्व समस्यांच्या निवारणासाठी करावी लागेल आणि त्यासाठी सर्वांना संघटीत होऊन प्रयत्न करावा लागेल. तरच शेतीची दुर्दशा व शोषणकारी अर्थव्यवस्था संपेल असा विश्वासही माथने यांनी व्यक्त केला.
सत्यप्रकाश भारत यावेळी म्हणाले, जे युवा वेळेनुसार घडणाºया बदलाला बघू शकत नाही. त्यांनी भारत मातेवर प्रेम दाखवू नये. कायद्यान्वये सर्व व्यवस्था या मानवाच्या सुखासाठी की दुखासाठी हा प्रश्न आहे. शिक्षणाचे मानवीकरण करण्याचे चालू आहे पण; यापेक्षा अर्थव्यवस्थेचे मानवीकरण झाले पाहिजे. भारताचा विकास हा गरीब व श्रीमंतीच्या निर्माणाकडे वाटचाल करीत आहेत. यामुळे देशात लोकतंत्र नसल्याचे दिसते. ही परिस्थिती आणि सुधारणा करण्याची जबाबदारी युवकांवर असल्याने याबाबत सकारात्मक विचार युवकांना करायचा आहे. या देशात जी समस्या निर्माण झाली ती शिक्षितांमुळेच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सत्राचे संचालन भारती तर आभार प्रदर्शन मनोज ठाकरे यांनी केले.