शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
2
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
3
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
6
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
7
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
8
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
9
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
10
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
11
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
12
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
13
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
14
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
15
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
16
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
17
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

लॉकडाऊन काळात गरजूंना शासकीय धान्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 5:00 AM

स्थानिक कामधंदे आणि मजुरीही बंद असल्याने शासकीय धान्याचा अनेकांना आधार मिळत आहे. त्यामुळे अनेकांच्या कुटुंबाची परिस्थिती सावरली जात आहे. त्यात त्यांना एका किलोवर एक किलो चणाडाळ मोफत मिळत असून शासनाने साखरही उपलब्ध करून दिली आहे.

ठळक मुद्देसाखर, चणाडाळचा लाभ : तालुक्यात, ३४ हजार १३५ रेशन कार्डधारक, १२३ रेशन दुकाने

राजेश सोळंकी।लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/ आर्वी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने आता गरिबांसोबतच मध्यमवर्गीय कचाट्यात सापडला आहे. स्थानिक कामधंदे आणि मजुरीही बंद असल्याने शासकीय धान्याचा अनेकांना आधार मिळत आहे. त्यामुळे अनेकांच्या कुटुंबाची परिस्थिती सावरली जात आहे. त्यात त्यांना एका किलोवर एक किलो चणाडाळ मोफत मिळत असून शासनाने साखरही उपलब्ध करून दिली आहे.तालुक्यात ८ हजार ११० अंत्योदय शिधापत्रिकाधारक आहेत. तर २१ हजार २५९ प्राधान्य गट कार्डधारक, २ हजार ७८१ शेतकरी कार्डधारक तर एपीएलचे १ हजार ९८५ असे एकूण २४ हजार १३५ शिधापत्रिकाधारक कुटुंबे आहेत.या शिधापत्रिकाधारकांना शहरातील २५, तर ग्रामीण भागातील ९८ अशा १२३ रेशन दुकानातून धान्याचे वितरण केले जाते. शासनाच्या अन्न नागरी व पुरवठा विभागातर्फे मे महिन्यात अंत्योदय गटासाठी ८१.१० किलो चणाडाळ ४५ रुपये किलोप्रमाणे वितरित करण्यात आली, तर त्यावर एक किलो मोफत चणाडाळ या गटाला देण्यात आली. मोफत वितरणासाठी पुन्हा ८१.१० किलो चणाडाळ देण्यात आली, तर १ हजार ४१३.६५ किलो मोफत तांदळाचे वितरण करण्यात आले.मे आणि जून महिन्यासाठी अंत्योदयसाठी गहू २ हजार ४३२.४० किलो, तांदूळ ३ हजार २४३.२० किलो तर साखर १६२.५ किलोचा साठा अंत्योदयसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. प्राधान्य गटासाठी २०६.४० किलो चणाडाळ (४५ किलो भावाप्रमाणे) तर २१६.८५ किलो चणाडाळ आणि ४ हजार ३०८.८० किलो तांदूळ मोफत वितरणासाठी देण्यात आले होते. मे जून महिन्यासाठी ५ हजार १६२.०४ किलो गहू तर ३ हजार ४४१.३६ किलो तांदूळ उपलब्ध करून देण्यात आला होता.शेतकरी गटासाठी ६६७.२४ किलो गहू, तर ४५८.१६ किलो तांदूळ मे जून महिन्याच्या वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. तर एपीएल गटासाठी २३०.८५ किलो गहू आणि १५३.९० किलो तांदूळ उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचे वितरण सुरू आहे. शासन निर्णयानुसार धान्य वितरणामुळे सर्वसामान्यांसह गरजूंना मोठा आधार मिळाला आहे.शेतकरी आणि एपीएल रेशन मोफत धान्य नाहीमे महिन्यात आतापावेतो अंत्योदय ७ हजार ३५१ कार्डधारकांना, प्राधान्य गट १९ हजार ५३४, तर शेतकरी गटातील २ हजार २५४ कार्डधारकांना धान्याचे वितरण करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात जून महिन्याचे वितरण सुरू होईल.लॉकडाऊन काळात अन्नसुरक्षा योजना किंवा कोणत्याही राज्य योजनेत समाविष्ट नसलेल्या विना शिधापत्रिकाधारक व्यक्तींना मे व जून या दोन महिन्यांकरिता प्रत्येक व्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत देण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. त्यासाठी विस्थापितांची नावे घेण्यासाठी नगरपालिका आणि पंचायत समितीला निर्देश देण्यात आले असून त्यांची नावे आल्यावर त्या पद्धतीने धान्यसाठा विस्थापितांना मोफत वितरित केला जाणार आहे.- अनिल पाटील, पुरवठा विभाग, तहसील कार्यालय, आर्वी.

टॅग्स :Socialसामाजिक