अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केली गो-कार्ट रेसिंग कार
By Admin | Updated: May 21, 2016 02:13 IST2016-05-21T02:13:05+5:302016-05-21T02:13:05+5:30
सेवाग्राम येथील बा. दे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गो-कार्ट ही कार तयार केली. ‘नो पोल्युशन नो साऊंड’

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केली गो-कार्ट रेसिंग कार
हैदराबाद येथील आॅल इंडिया आयएसके सिरीज आॅफ कारटिंगमध्ये नोंदविला सहभाग
वर्धा : सेवाग्राम येथील बा. दे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गो-कार्ट ही कार तयार केली. ‘नो पोल्युशन नो साऊंड’ अशा या कारने हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीयस्तरावरील आय.एस.के. सिरीज आॅफ कारटींग इव्हेंटमध्ये सहभागी होत अंतिम फेरीत धडक मारली. या विद्यार्थ्यांनी या कामगिरीसह महाविद्यालयाचे व राज्याचेही नाव उंचावले आहे. स्पर्धेत देशभरातून ५० स्पर्धक सहभागी झाले होते. तर महाराष्ट्रातून केवळ चार स्पर्धकांना प्रवेश मिळाला.
मेकॅनिकल इंजि. विभागातील मेकट्रॉन क्लबचे प्रणय बोकडे, संकेत चौधरी, आदित्य कंत्रोजवार, विशाल मोरे, निरज अगदारी, विकीन काळे, भूषण बावनकुळे, तन्मय अग्रवाल, अक्षय रूद्रकार अशी या विद्यार्थ्यांनी नावे आहेत. गो-कार्ट (सिंगल सिटर आय.सी. इंजीन आॅपरेटेड फोर व्हिलर कार) या रेसिंग कारविषयी माहिती देतांना मेट्रॉन क्लबचे प्रणय बोकडे व संकेत चौधरी म्हणाले की, मेकॅनिकल इंजिनिअरींग म्हणजे केवळ थेरॉटिकल ज्ञान नसून प्रात्यक्षिकावर भर द्यावा लागतो. विविध यंत्राची माहिती वाचून होत नाही तर प्रत्यक्ष त्यावर प्रयोग करावा लागतो. हाच दृष्टीकोन ठेऊन आम्ही रेसींग कार बनविण्याचा निश्चिय केला. कार डिझाईन, स्पेअर पार्टस अशा विविध बाबी तपासल्या आणि निर्मितीची सुरूवात केली. मेकॅनिकल विभागाचे प्रा. रजत डाहाके, प्रा. एस.माने यांनी मार्गदर्शन केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
रेसींग कारचे निकषानुसार कारची निर्मिती केली. राईट बार, फ्युअल टँक, रॉ मटेरिअरल अशा पार्टसची जुळवणी केली. १२५ सीसीचे इंजीन, चार गिअर, ताशी ७० कि़मी. वेग अशी कारची वैशिष्ट्ये आहे. ‘नो पोल्युशन नो साऊंड’ अशी ही रेसिंग कार आहे. आसनाच्या बाजूला इंजीन, उंची, वजन अशा सर्व नियमांची पूर्तता केली आहे. तांत्रिकदृष्ट्या ही कार सक्षम असल्याचे सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)