शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

.. आणि चोरट्यांनी ठोकली धूम, सुरा उगारलेल्या चोरट्यांचा 'तिने' धैर्याने केला सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 11:28 IST

सकाळी विद्यार्थी शाळेत गेले असता एका विद्यार्थिनीची नजर या चोरट्यांवर पडताच चोरट्यांनी तिच्यावर सुरा उगारला. पण, तिने मोठ्या धैर्याने ‘चोर.. चोर...’ अशी आरोळी ठोकताच त्यांनी धूम ठोकली.

ठळक मुद्देचोरटे झाले पसार; हुसनापूर येथे दहशत

वर्धा : दिवसभर शेतशिवारातून काम करून आलेले नागरिक झोपी गेले असता गावात आलेल्या चोरट्यांनीचोरीचा सपाटा लावला. दोन घरी हात साफ करून गावातील शाळेचा आश्रय घेत रात्र काढली. सकाळी शाळा सुरू होताच एका चिमुकलीची नजर या चोरट्यांवर पडताच चोरट्यांनी तिच्यावर सुरा उगारला. पण, तिने मोठ्या धैर्याने ‘चोर.. चोर...’ अशी आरोळी ठोकताच त्यांनी धूम ठोकली. ही एखाद्या कथानकाप्रमाणे वाटणारी घटना देवळी तालुक्यातील हुसनापूर येथे घडली असून, या चोरट्यांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागपूर ते यवतमाळ या राष्ट्रीय महामार्गालगत दोनशे ते अडीचशे लोकवस्तीचे हुसनापूर हे गाव आहे. या गावातील नागरिक शेती व मोलमजुरी करतात. चोरट्यांनी १ जानेवारीच्या रात्रीला दिलीप वाहारे यांच्या घरी ५० हजार रुपयांच्या ऐवजावर हात साफ केला, तर सुधाकर वाघमारे यांच्या घरातील सर्व सदस्य बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरातील मुद्देमाल पळविला.

दुसऱ्या दिवशी चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी रात्रीला गस्त घालायला सुरुवात केली. त्यानंतर ३ जानेवारीला चार ते पाच अनोळखी व्यक्ती गावात आढळून आल्याने गस्तीवर असलेल्या नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला तर ते अंधाराचा फायदा घेऊन शाळेच्या शौचालयात दडून बसले. ग्रामस्थांनी सर्वत्र शोधाशोध करूनही थांगपत्ता लागला नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता गावातील विद्यार्थी शाळेत गेले असता वर्ग चौथीतील विद्यार्थी तनू गणेश वाहारे, कार्तिक तोडासे, नयन महाजन यांनी नेहमीप्रमाणे वर्गाची साफसफाई करायला निघाले. तेव्हा तोंडाला बांधून असलेले पाच व्यक्ती शौचालयाकडून पुढे आले. त्यांनी तनू या मुलीला चॉकलेट देऊ केले; पण तिने नकार देत ‘चोर... चोर’ अशी आरोळी ठोकली. चोरट्यांनी उगारलेला सुरा तिच्या दिशेने फेकत पळ काढला. सुदैवाने तनू यातून बचावली. गावकऱ्यांनी शाळेकडे धाव घेत गर्दी केली. तोपर्यंत ते पाचही चोर शाळेच्या भिंतीवरून उडी घेऊन शेताच्या दिशेने पसार झाले होते. या घटनेने गावात खळबळ उडाली असून, सर्वांनी तनूच्या धाडसाचे कौतुक केले.

तक्रार घेण्यास पोलिसांचा नकार

हुसनापूरमध्ये एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी केल्यानंतर तक्रार देण्याकरिता गेलेल्या नागरिकांची तक्रार घेण्यास देवळी पोलिसांनी नकार दिला. पोलिसांनी वेळीच तक्रार दाखल करून तपास केला असता तर चोरट्यांचा गावात मुक्काम राहिला नसता, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांप्रति गावामध्ये रोष व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीThiefचोरSchoolशाळाStudentविद्यार्थी