केळझरच्या शेतकऱ्यांना दिली दिवाळीची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 21:54 IST2018-11-05T21:53:49+5:302018-11-05T21:54:05+5:30
येथील ४०६ शेतकयांच्या शेतजमीनी अखेर वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये परावर्तीत करण्यात आल्या. मागील अनेक वर्षांपासून शेतकरी शासन दरबारी उंबरठे झिजवत होते. परंतु त्यांना न्याय मिळत नव्हता याबाबत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेतल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळाला.

केळझरच्या शेतकऱ्यांना दिली दिवाळीची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : येथील ४०६ शेतकयांच्या शेतजमीनी अखेर वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये परावर्तीत करण्यात आल्या. मागील अनेक वर्षांपासून शेतकरी शासन दरबारी उंबरठे झिजवत होते. परंतु त्यांना न्याय मिळत नव्हता याबाबत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेतल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळाला.
दिवाळीच्या पर्वावर ही भेट आमदार भोयर यांनी दिली. केळझर येथील ४०६ शेतकऱ्यांच्या शेतजमीन वर्ग २ मध्ये होत्या त्या जमिनी वर्ग १ मध्ये करण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्यासाठी शेतकऱ्यांनी सतत तहसील कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. परंतु हा प्रश्न निकाली निघाला नाही .शेतकऱ्यांनी ही गंभीर बाब आ. भोयर यांच्या निर्दशनास आणून दिली. आ.भोयर यांनी याबाबत तातडीने पावले उचलत तहसील कार्यालयास कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. महसूल विभागाने कार्यवाही करीत ४०६ शेतकऱ्यांच्या जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये परावर्तित केल्या.
सोमवारी आमदार डॉ. भोयर यांनी संबंधित शेतकऱ्यांना तसे पत्र दिले यावेळी सरपंच रेखा शेंद्रे ,जि.प. सदस्य विनोद लाखे, ग्राम पंचायत सदस्य अनिल तेलरांधे, सेलू तालुका भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष विलास वरटकर, पीरबाबा दर्गा टेकडीचे अध्यक्ष डॉ इर्शाद शेख, भाजप सर्कल प्रमुख विजय खोडे, सिद्धीविनायक देवस्थानचे अध्यक्ष माधव इरुटकर ,मंडळ अधिकारी भलावी, पटवारी राउत आदी उपस्थित होते. मंडळ अधिकारी व पटवारी यानी ३० नोव्हेंबरपर्यंत सातबारा देण्यात येईल अशी माहिती दिली. यावेळी शेतकरी उपस्थित होते.