हातगाडीच्या माध्यमातून केली रोजगारावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:05 IST2017-11-12T23:05:45+5:302017-11-12T23:05:57+5:30

रोजगारासाठी नागरिक सतत भटकंती व स्थलांतर करीत असतात. शिक्षण घेतलेले ‘व्हाईट कॉलर’ ‘जॉब’च्या प्रतीक्षेत वय व वेळ वाया घालवितात.

Get rid of the employment through the handcart | हातगाडीच्या माध्यमातून केली रोजगारावर मात

हातगाडीच्या माध्यमातून केली रोजगारावर मात

ठळक मुद्देबी.ए. शिकलेल्या तरूणाचे धाडस : स्वत:च्या शेतात लावला ऊस व स्वीटकॉर्न

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : रोजगारासाठी नागरिक सतत भटकंती व स्थलांतर करीत असतात. शिक्षण घेतलेले ‘व्हाईट कॉलर’ ‘जॉब’च्या प्रतीक्षेत वय व वेळ वाया घालवितात. काही शासनाच्या योजनांचा लाभ घेत चौक राखतात; पण येथील युवकाने नोकरीच्या मागे न लागता ऊसाच्या रसाची बंडी, कणीस विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. अन्य तालुक्यातही हा व्यवसाय सुरू करण्याचा मानस त्याने व्यक्त केला.
सध्या सेवाग्राम येथे ऊसाच्या रसाची बंडी सुरू करण्याचे धाडस करीत सदर युवकाने स्वयंरोजगार सुरू केला. सोबतच अन्य तालुक्यांत इतरांना रोजगार देण्याचा मानसही गौरव तिडके यानी व्यक्त केला आहे. गौरवचे शिक्षण बी.ए. पर्यंत झाले. वडील पारंपरिक पद्धतीने शेती करीत आहे. शिक्षण झाले; पण नोकरीची संधी दिसत नव्हती. जिल्ह्यात हातगाडीवरून व्यवसाय करणाºया परप्रांतीयांना पाहून गौरवच्या मनात कल्पना आली. त्याने मेडिकल चौकात रसवंती सुरू केली. ती उन्हाळ्यातच चालते, असे नाही तर हिवाळ्यातही रसाला मोठी मागणी असल्याचे दिसून आले. नेमकी हिच बाब हेरून त्याने दोन हातगाड्या तयार केल्या. एका गाडीवर स्वत: तर एका युवकाला तयार करून रोजगार सुरू केला.
पावसाळ्यात नागरिक आवडीने भाजलेले कणीस व भेळ खातात. कणीसचा सिजन पावसाळ्यात असल्याने रोजगाराची संधी आहे. स्वत:च्या शेतात स्वीटकॉर्न व ऊसाचे उत्पादन घेतल्यास फायदा अधिक होता. या सर्वांचा हिशेब करून या व्यवसायाकडे तो वळला. यातून रोजगाराचा प्रश्न सुटला. सोबतच तो अन्य युवकांना रोजगार उपलब्ध करून देत आहे, हे विशेष! एका युवकाने रोजगाराच्या वाटा स्वत:च शोधून काढल्या. शेतावर पूर्णत: निर्भर न राहता पूरक व्यवसायातून विकासाची वाटू शोधून काढली.
अन्य युवकांनाही रोजगार देण्याचा मानस
प्रारंभी सेवाग्राम येथील मेडिकल चौकात रसवंती लावून स्वयंरोजगार सुरू करणाºया गौरवने आता दुसरी गाडीही तयार केली आहे. या गाडीवर अन्य एका युवकाला रोजगार दिला आहे. दोन गाड्यांवर ऊसाचा रस आणि कणिस विकण्याचा रोजगार त्याने शोधला आहे. आता त्याला अन्य तालुक्यांतही हाच व्यवसाय सुरू करावयाचा आहे. यासाठी तो अन्य बेरोजगार युवकांना रोजगार देण्याच्या मानसिकतेत आहे. त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Get rid of the employment through the handcart