वाळूसाठ्याच्या रगड्यात सर्वसामान्यांचे तेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 10:25 PM2019-06-10T22:25:34+5:302019-06-10T22:26:08+5:30

जिल्ह्यात वाळूघाटावर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करून साठा करण्यात आला. त्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून जिल्हा खनिकर्म अधिकारी व तलसीलदार यांच्या पथकाने धडक कारवाई करून तब्बल ७० साठ्यावरून ५ हजार २०० ब्रास वाळू जप्त केली. या कारवाईत वाळू माफियांसह बांधकामाकरिता साठवून ठेवलेली वाळूही जप्त करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

General oil in the sand roller | वाळूसाठ्याच्या रगड्यात सर्वसामान्यांचे तेल

वाळूसाठ्याच्या रगड्यात सर्वसामान्यांचे तेल

Next
ठळक मुद्दे७० ठिय्यांवर कारवाई : ५ हजार २०० ब्रास वाळू जप्त, साठेबाजांना बजावली नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात वाळूघाटावर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करून साठा करण्यात आला. त्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून जिल्हा खनिकर्म अधिकारी व तलसीलदार यांच्या पथकाने धडक कारवाई करून तब्बल ७० साठ्यावरून ५ हजार २०० ब्रास वाळू जप्त केली. या कारवाईत वाळू माफियांसह बांधकामाकरिता साठवून ठेवलेली वाळूही जप्त करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
जिल्ह्यात वर्षभर वाळू घाटांचे लिलाव झाले नसले तरीही वाळू माफियांनी चोरट्या मार्गाने वाळूचा साठा करून दामदुप्पट दराने विकला. यावर्षी आठ घाटांचा प्रारंभी लिलाव झाल्याने वाळूउपस्याला जोर आला होता. पण, नंतर पुन्हा उपस्यावर बंदी आल्यानंतरही वाळूची वाहतूक सुरुच होती. शहरातील वाळूमाफियांनी शहराच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नियमबाह्यरीत्या वाळूची साठेबाजी केली होती.
याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या सूचनेवरून जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख आणि तहसीलदार प्रीती डुडुलकर यांच्या पथकातील देवेंद्र राऊत आणि कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी धाडसत्र राबवत तब्बल ७० वाळूसाठे जप्त केले. साठेबाजांना नोटीस बजावली असून त्यांच्या उत्तरानंतर दंडात्मक कारवाई करून जप्तीत असलेल्या वाळूसाठ्यांचा नंतर लिलावही करण्यात येणार आहे. या कारवाईने माफियांच्या पायाखालची वाळू सरकली असून शासनाला मोठा महसूल मिळणार आहे.
वाळूसम्राट ठमेकरांच्या साम्राज्याला धक्का
वर्धा शहरातच नव्हे, तर जिल्ह्यात वाळू तसेच गौणखनिज सम्राट म्हणून ओळखल्या जाणाºया होमेश ठमेकर यांच्या सालोड येथील एकाच ठिकाणावरून तब्बल १ हजार २०० ब्रास वाळू जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आतापर्यंतचा सर्वांत मोठा साठा असल्याचेही बोलेले जात आहे. एरवी बड्या अधिकाºयांची कृपादृष्टी असलेल्या ठमेकर यांच्यावरच कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सालोड मार्गालगतच्या परिसरात मुख्य मार्गापासून आतमध्ये ठमेकर यांची सीसीटीव्ही कॅमेरे असलेली इमारत असून मोठा वाळूसाठा तसेच त्यांची वाहनेही नेहमीच उभी असतात. आतापर्यंत या ठिकाणावर कुण्याही अधिकाºयांची नजर गेली नाही. या कारवाईत मात्र त्यांनाच लक्ष्य करण्यात आल्याने साम्राज्य धोक्यात आले आहे.
वाळू विकत घेतल्यानंतरही कारवाईचा ससेमिरा
शहराच्या परिसरातील वाळू साठ्यावर कारवाई करताना पथकाने दिसलेला प्रत्येक वाळूसाठा जप्त केला. यामध्ये कमीत कमी आठ ब्रासपासून तर जास्तीत जास्त १ हजार २०० ब्रासपर्यंत वाळू जप्त केली आहे. यातील बहुतांश वाळू साठा १० ते ३० ब्रास दरम्यानचा असून ही वाळू अनेकांनी आपल्या घराच्या बांधकामाकरिता आणली आहे. घराचे सुरू असलेले बांधकाम किंवा नियोजित बांधकामाकरिताही अनेकांनी वाळूचा साठा केला आहे. पावसाळ्यात वाळू मिळणार नाही म्हणून किंवा उन्हाळ्यात पाण्याअभावी अनेकांनी बांधकाम थांबविल्यामुळेही त्यांच्या रिकाम्या भूखंडावर किंवा घरासमोर वाळूसाठा पडलेला आहे. हा साठाही जप्त केल्याने नागरिकांचा पैसाही गेला आणि त्यांना नोटीस आल्याने कारवाईचा ससेमिराही मागे लागला. त्यामुळे बांधकामाकरिता असलेला ३० ब्रासपर्यंतचा वाळूसाठा या कारवाईतून वगळवा, अशीही मागणी होत आहे.
खनिकर्म विभागाने दिली होती सूचना
वाळूघाट बंदी असतानाही चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा खनिकर्म विभागाकडून कारवाई करीत बांधकामासाठी वाळूचा साठा करताना नागरिकांनी वाळू घेतल्याबाबत पावती जवळ ठेवावी, अन्यथा तो साठा अवैध ठरवून कारवाई केली जाईल, अशा सूचना केल्या होत्या. परंतु वाळू व्यवसायिकांनीही पावती दिली नाही आणि नागरिकांनीही मागितली नाही. परिणामी आता त्यांना कारवाईस समोरे जावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शहरासह आजूबाजूच्या परिसरात धाडसत्र राबवून आतापर्यंत जवळपास ८० साठ्यांवर कारवाई करण्यात आली. ७० साठ्यांचे पंचनामे करून साठेधारकांना नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडून उत्तर प्राप्त होताच दंडात्मक कारवाई केली जाईल. ज्यांनी बांधकामाकरिता वाळू साठवून ठेवली असेल, त्यांनी तसे कारण व पुरावे दिल्यास त्यांच्यावर जिल्हाधिकाºयांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई केली जाईल.
-प्रीती डुडुलकर, तहसीलदार, वर्धा.

Web Title: General oil in the sand roller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.