सावली (सा.) येथे गॅस्ट्रोची लागण
By Admin | Updated: August 2, 2015 02:38 IST2015-08-02T02:38:24+5:302015-08-02T02:38:24+5:30
तालुक्यातील सावली (सास्ताबाद) येथे अतिसाराची लागण झाली. येथील १० जणांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य ...

सावली (सा.) येथे गॅस्ट्रोची लागण
वर्धा: तालुक्यातील सावली (सास्ताबाद) येथे अतिसाराची लागण झाली. येथील १० जणांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालय व विलगीकरण कक्षात उपचारकरिता दाखल करण्यात आले.
प्रकाराची माहिती मिळताच प्राथिमक आरोग्य केंद्र खरांगणा (गोडे) येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक गावामध्ये दाखल झाले. पथकाने साथरोग प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच जिल्हास्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकाने तत्काळ सावली येथे भेट देवून कार्यवाही केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
सावली हे १ हजार ३०४ लोकवस्तीचे गाव आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतामध्ये सार्वजनिक विहीर नळ योजना, तीन हॅन्डपंप आहेत. सद्यस्थितीत गावात नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. नळ योजनेच्या व्हॉलला गळती व नळाखाली नागरिकांनी खड्डे करून नळाला तोट्या लावल्या नसल्याने खड्ड्यातील दूषित पाणी परत मुख्य पाईप लाईनमध्ये जावून तेच नारिकांच्या पिण्यात जात आहे. गत सात दिवसांपासून शुद्धीकरण न केल्याने दूषित पाणी पुरवठा झाला. त्यामुहे ही समस्या उद्भवल्याचे समोर आले. लागण झालेल्या रूग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली असून रूग्णाची प्रकृती सुधारत आहे. सावली (सा.) येथे अतिसाराचा उद्रेक घोषित करण्यात आलेला होता. सध्या गावात साथरोग परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही त्यांनी कळविले आहे. रुग्णांवर उपचार सुरू आहे.(प्रतिनिधी)