शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

गरिबाची ‘उज्ज्वला’ दुर्लक्षी धोरणामुळे गॅसवरून चुलीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 5:00 AM

केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. जिल्ह्यातील २, ८०,६९२ सिलिंडरधारकांपैकी ४१, ६१० उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असून या सर्वांना जिल्ह्यातील २७ गॅस एजन्सीच्या माध्यमातून सिंलिडरचा पुरवठा होतो. शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सिलिंडर व शेगडी मोफत दिली. मात्र, आता सिलिंडर भरुन घेण्यासाठी ८२१ रुपये मोजावे लागत आहे. सिलिंडर सध्या  ८२१ रुपयांचे  असून उज्ज्वलाच्या लाभार्थ्यांना ८० तर इतर ग्राहकांना ४० रुपये अनुदान मिळते.

ठळक मुद्देगृहिणींना ८२१ रुपयांचे सिलिंडर परवडणारे नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाढती वृक्षतोड थांबविण्यासाठी आणि महिलांचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरु केली. या योजनेंतर्गत गावागावात मोठ्या प्रमाणात मोफत गॅस जोडणीचे वितरण करण्यात आले. परंतु, गॅस सिलिंडरचे दर झपाट्याने वाढायला लागले. शासनाकडून मिळणारे अनुदान कमी आणि सिलिंडरचे दर आठशे पार गेल्याने ग्रामीण भागात ‘उज्ज्वला’ योजना गुंडाळली असून गृहिणींनी पुन्हा चूल पेटवायला सुरुवात केली आहे.ग्रामीण भागात चुलीवरच स्वयंपाक केला जातो. यातून निघणाऱ्या धुरामुळे महिलांना विविध आजार होतात. तसेच इंधनाकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागते. याच बाबी लक्षात घेऊन केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. जिल्ह्यातील २, ८०,६९२ सिलिंडरधारकांपैकी ४१, ६१० उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असून या सर्वांना जिल्ह्यातील २७ गॅस एजन्सीच्या माध्यमातून सिंलिडरचा पुरवठा होतो. शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सिलिंडर व शेगडी मोफत दिली. मात्र, आता सिलिंडर भरुन घेण्यासाठी ८२१ रुपये मोजावे लागत आहे. सिलिंडर सध्या  ८२१ रुपयांचे  असून उज्ज्वलाच्या लाभार्थ्यांना ८० तर इतर ग्राहकांना ४० रुपये अनुदान मिळते. यामुळे आता सर्वसामान्यांनाही सिलिंडर घेणे परवडणारे नाहीत. पण करणार काय हा त्यांच्यासमोरील प्रश्न आहे. ग्रामीण भागात चुलीचा पर्याय असल्याने उज्ज्वला योजनेतील शेगडी व सिलिंडर गुंडाळून आता पुन्हा चुलीवर रांधायला सुरुवात झाली आहे. 

कमाई कमी, गॅसचा खर्च वाढताचप्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न ४४ हजार तर शहरी लाभार्थ्यांचे उत्पन्न ५९ हजार रुपये ग्राह्य धरले जातात. यावरुन त्यांच्या मासिक उत्पन्नाचा अंदाज घेतला तर ते ५,००० रुपयांच्या आतच येते.कमी उत्पन्नात दरमहा ८०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम गॅस सिलिंडरवर खर्च करणे त्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे चुलीचाच पर्याय निवडला जात आहे.

गृहिणी काय म्हणतात...

चुलीपेक्षा गॅसवर लवकर स्वयंपाक होतो. त्यामुळे गॅस सिलिंडर घेतले. काही दिवस गॅसचा वापरही केला. परंतु आता सिलिंडरचे दर गगणाला भिडल्याने नियमित गॅसचा वापर करणे परवडणारे नाहीत. म्हणून पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे- वृषाली अजय बोबडे, आर्वी.

उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस-सिलिंडर मिळाल्यापासून चुलीचा वापर कमीच झाला. आता इंधन, रॉकेलही मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे दीडशे-दोनशे रुपयाने रोजमजुरी करुन सिलिंडर विकत घ्यावे लागत आहे. सिलिंडरचे दर वाढत आहे. अशातही तडजोड करीत आहे.- ज्योती कंगाले, रिधोरा.

शेतातील पºहाटी, तुरीचे फणकट आणि लाकडही सहज उपलब्ध होते. त्यामुळे चुलीचा वापर जास्त असतो.  परंतु कधी ओले इंधन पेटायला वेळ लागतो, कधी कामाची धावपळ असते, अशा वेळी गॅसचा वापर करतो. आता घरोघरी गॅस उपलब्ध झाल्याने आम्हीही गॅस कनेक्शन घेतलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून सिलिंडरचे दर वाढायला लागल्याने गॅसचा वापर आणखी कमी केला आहे.- प्रणोती झाडे, सोनेगाव (बाई)

सर्वत्रच आता गॅसचा वापर वाढला आहे. शासनाच्या योजनेमुळे गरिबांच्याही घरात आता गॅस सिलिंडर पोहोचले आहे. तसेच ग्रामीण भागात बहुतांश घरामध्ये चुलीवरच स्वयंपाक केला जातो. महागड्या गॅसचा वापर मोजक्याच कामासाठी केला जातो.- सुलभा राखुंडे, वर्धा. 

आम्ही दोघेही मोलमजुरी करुन घर चालवितो. आता शासनाची योजना असल्याने आम्हीही गॅस कनेक्शन घेतले. गॅस घेतल्यापासून चुलीचा वापर कमी झाला. परंतु सिलिंडरचे दर सतत वाढत असल्याने सिलिंडर भरण्यासाठी मोठी अडचण जात आहे.-प्रतिभा बेंडे, झडशी.

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर