शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

सागवान चोरांची टोळी जेरबंद

By admin | Updated: June 20, 2017 01:05 IST

तालुक्यातील जंगलातील सागाचे मोठे झाड तोडून चोरीच्या मार्गाने विकणाऱ्या टोळीचा वनविभागाने पर्दाफाश केला आहे.

तिघांवर वन गुन्हा : दोघांना अटक, सागवान जप्तलोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : तालुक्यातील जंगलातील सागाचे मोठे झाड तोडून चोरीच्या मार्गाने विकणाऱ्या टोळीचा वनविभागाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तिघांवर सोमवारी वन गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे. येथील अन्वर शहा (३५) याने पंजीलाल उईके (४०) याला जंगलातील सागाचे झाड तोडून सर्व मुद्देमाल अन्वरच्या सांगण्यावरून त्याच्या घरी, काही अन्वरच्या शेतात तर काही त्याचा भाऊ हारुण शहा याच्या शेतात ठेवत होता. दरम्यान १८ जून रोजी सिंदीविहीरा बीटमध्ये तळेगाव वनक्षेत्राचे क्षेत्रसहाय्यक एस.आर. देशमुख व काही वनरक्षक जंगलात रोपवणाची पाहणी करायला गेले होते. त्यांना कुऱ्हाडीने काहीतरी तोडल्याचा आवाज येवू लागला. त्या आवाजाच्या दिशेने कर्मचारी गेले असता पंजीलाल सागाचे मोठे झाड कापताना दिसला. त्याला ताब्यात घेवून सविस्तर चौकशी केली असता सदर कारनामा अन्वर शहा याच्या सांगण्यावरून करीत असल्याचे समोर आले.सोमवारी आष्टी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी तळेगावचे क्षेत्रसहाय्यक एस.आर. देशमुख यांनी संयुक्त कारवाई करीत आरोपी पंजीलाल उईके, हारुण शहा या दोघांना ताब्यात घेतले. मुख्य आरोपी अन्वर शहा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. अधिक माहितीमध्ये वनविभागाला मोठया प्रमाणात सागवान असल्याचे समजल्यावर दोन्ही आरोपीचे शेत, घर याची झडती घेण्यात आली. यामध्ये गोठ्यात व शेतात सागवान साठवून असल्याचे दिसून आले. या कारवाईत ४८ हजार रुपयांचे ५०० फुट सागवान जप्त करण्यात आले. याआधी तोडलेली झाड किती, मुद्देमाल किती विकला याची माहिती आरोपीकडून घेणे सुरू आहे. याप्रकरणी अवैध वृक्षतोड १९२७ चे कलम (३३) अन्वये आरोपींवर वनगुन्हा दाखल करण्यात आला. वन्यप्राणी शिकारीचे पुरावेअवैध सागवान वृक्षतोड विक्रीसोबतच आरोपी अन्वर शहा याच्या गोठ्यामधून ठिपक्याच्या चितळाचे चार नग सिंग पोत्यात बांधलेल्या अवस्थेत मिळून आले आहे. वन्यप्राण्यांची शिकार करून विकणे यासाठी आरोपी अन्वर शहा याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९ अन्वये वनगुन्हा दाखल केला. या दोन्ही प्रकरणाची दखल वनविभागाने घेतली असून आरोपींवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले.