ट्रकचालकांना लुटणारी टोळी सावंगीत जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:48 IST2018-06-02T23:48:09+5:302018-06-02T23:48:09+5:30

लांब पल्ल्यांचा प्रवास करणारे ट्रक चालक विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून झोपतात. अशाच ट्रक चालकाचे साहित्य पळविणाऱ्या दोन चोरट्यांना सावंगी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील आरोपी मुळचे कर्नाटक येथील असून ते अल्पवयीन आहेत.

Gang-ridden gang rickshaw | ट्रकचालकांना लुटणारी टोळी सावंगीत जेरबंद

ट्रकचालकांना लुटणारी टोळी सावंगीत जेरबंद

ठळक मुद्देदोन्ही आरोपी अल्पवयीन : कर्नाटकातून येऊन वर्धेत केली लुटमार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लांब पल्ल्यांचा प्रवास करणारे ट्रक चालक विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून झोपतात. अशाच ट्रक चालकाचे साहित्य पळविणाऱ्या दोन चोरट्यांना सावंगी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील आरोपी मुळचे कर्नाटक येथील असून ते अल्पवयीन आहेत.
सावंगी पोलिसांची चमू गस्तीवर असताना दोन युवक संशयास्पद हालचाली करताना आढळले. त्यांना ताब्यात घेवून पोलिसी हिसका देत विचारणा केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चार महागडे मोबाईल व १६ हजार रुपये असा एकूण ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपींनी हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात असेच गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संतोष शेगावकर, रामदास बिसने, संघसेन मुडे, विकास अवचट आदींनी केली आहे.

Web Title: Gang-ridden gang rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा