गांधीजींच्या चरख्यावर पोळ्यासाठी बैलाचे खास वेसण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 15:45 IST2017-08-20T15:37:20+5:302017-08-20T15:45:03+5:30
पोळ्याच्या सणात शेतकºयांकडून बैलांसाठी वेसण, चवळे, मटाट्या याची प्रत्येक पोळ्याला खरेदी होते. प्रत्येक पोळ्याला बदलली जात असलेली वेसण वर्धेतील काही कारागिरांकडून महात्मा गांधी यांनी दिलेल्या चरख्याच्या माध्यमातून होत आहे.

गांधीजींच्या चरख्यावर पोळ्यासाठी बैलाचे खास वेसण
रूपेश खैरी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
पोळ्याच्या सणात शेतकºयांकडून बैलांसाठी वेसण, चवळे, मटाट्या याची प्रत्येक पोळ्याला खरेदी होते. प्रत्येक पोळ्याला बदलली जात असलेली वेसण वर्धेतील काही कारागिरांकडून महात्मा गांधी यांनी दिलेल्या चरख्याच्या माध्यमातून होत आहे.
ग्रामोद्योगाची शिकवण देणाºया महात्मा गांधी यांचा वारसा लाभलेल्या वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे), सेलू तालुक्यातील महाबळा या गावांत हा व्यवसाय करणाºया कुटुंबांचा समूह आहे. पोळ्याच्या दोन महिन्याच्या पूर्वीपासूनच या कामाला प्रारंभ होतो. यात एक परिवार साधारणत: ३०० किलो सुताची कताई करून वेसण तयार करतो. यानंतर त्याला विविध रंगात रंगवून त्याचा पुरवठा करतो. आज बैलांची संख्या तुलनेत रोडावल्याने हा व्यवसाय मोडकळीस येत असल्याचे कारंजा येथील व्यवसायिक दिनेश चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पोळ्याच्या सणाकरिता लागणाºया वेसणाची तयारी दोन महिन्यापूर्वी सुरू होते. वेसण तयार करण्याकरिता महात्मा गांधी यांच्या चरख्याचा आजही वापर होत आहे. एका धाग्यापासून तब्बल १२ एमएमच्या दोरापासून तीन फूट लांबीचा दोरखंड म्हणजे वेसण तयार होते. वेसणाची एक जोडी बनवायला तब्बल चार तास परिश्रम घ्यावे लागतात.
- पीर महम्मद, वेसण निर्माते, कारंजा (घाडगे)