गांधी विचारांना कृतीची जोड हवी

By Admin | Updated: August 14, 2014 23:52 IST2014-08-14T23:52:45+5:302014-08-14T23:52:45+5:30

देशाला स्वातंत्र मिळाले; पण त्यापुढे जाऊन गांधी विचार हा वैश्विक आहे़ यामुळे त्याला कृतीशी जोड देणे गरजेचे आहे़ हिंदी स्वराज्य पुस्तक वाचावे़ त्यातून गांधी विचारांची प्राप्ती होते,

Gandhi thought should be linked to action | गांधी विचारांना कृतीची जोड हवी

गांधी विचारांना कृतीची जोड हवी

अध्ययन केंद्रास प्रारंभ : सुगन बरंठ यांचे मत
वर्धा : देशाला स्वातंत्र मिळाले; पण त्यापुढे जाऊन गांधी विचार हा वैश्विक आहे़ यामुळे त्याला कृतीशी जोड देणे गरजेचे आहे़ हिंदी स्वराज्य पुस्तक वाचावे़ त्यातून गांधी विचारांची प्राप्ती होते, असे प्रतिपादन नई तालीम समितीचे अध्यक्ष डॉ़ सुगन बरंठ यांनी केले़
न्यू आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज येथे महत्मा गांधी अध्ययन केंद्राचे त्यांच्या हस्ते करण्यात आले़ झाले. यावेळी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी डॉ. आर.जी. भोयर तर प्रमुख अतिथी म्हणून म़ गांधी औद्योगिकरण संस्थानचे निदेशक डॉ. पी.बी. काळे, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठाणचे मंत्री डॉ़ श्रीराम जाधव, माजी प्राचार्य प्रा. व्ही.के. पांडे, डॉ. पंकज भोयर, हिंदी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. देवराज, महात्मा गांधी अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. प्रशांत कडवे आदी उपस्थित होते.
पूढे बोलताना डॉ़ सुगन बरंठ यांनी महात्मा गांधींच्या विविध पैलूवरही उपस्थितांना मार्गदर्शन केले डॉ. पी.बी. काळे यांनी पाणी, वीज वाचविण्याकरिता प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. खादी वस्त्राचा वापर करावा व तरूण पिढीने खेड्याकडे जाऊन गांधी विचार आत्मसात करणे गरजेचे आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे, असे सांगितले़ डॉ. श्रीराम जाधव यांनी खादी एक कापड नाही, एक विचार आहे़ खादीचे हे महत्त्व या अर्थाने त्यांनी उपस्थिताना पटवून दिले. गांधीजींच्या विचारातून व्यापक दृष्टीकोण मिळविला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले़ प्रा. व्ही.के. पांडे यांनी गांधीजी प्रसिद्ध साहित्यिक होते. त्यांची कृती सत्यात उतरविणे खरोखरच कठीण आहे; पण सामान्यांनी ते अंगिकारले पाहिजे, असे सांगितले़ डॉ. आर.जी. भोयर यांनी गांधीजींच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारच्या अध्ययन केंद्राची अधिकाधिक ठिकाणी निर्मिती व्हावी व त्यातून गांधीजींचे विचार आत्मसात करावे, असे सांगितले़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. प्रशांत कडवे यांनी केले. संचालन डॉ. वंदना पळसापुरे यांनी केले तर आभार डॉ. मदन इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Gandhi thought should be linked to action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.