वर्ध्यात भरतो पोलिसांच्या नाकाखाली जुगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 15:54 IST2018-04-27T15:53:48+5:302018-04-27T15:54:16+5:30
येथील पोलीस मुख्यालयाच्या आवारात असलेल्या एका पोलीस क्वार्टरमध्ये जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी कार्यवाही केली. यात तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य चार जणांन अटक करण्यात आली.

वर्ध्यात भरतो पोलिसांच्या नाकाखाली जुगार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा - येथील पोलीस मुख्यालयाच्या आवारात असलेल्या एका पोलीस क्वार्टरमध्ये जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी कार्यवाही केली. यात तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य चार जणांन अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४४ हजार रुपयांच्या रोख रकमेसह दोन मोबाईल असा एकूण ५५ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कार्यवाही शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांच्या सुरक्षेत त्यांच्याच नाकाखाली भरलेल्या या जुगारामुळे दिव्याखाली अंधाराचा प्रकार मात्र वर्धेत उघड झाला.
या कारवाईत सावंगी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला रविंद्र डहाके, बॉम्ब निरोधक पथकाचा कर्मचारी निलेश मैदपवार व क्वार्टर नावे असलेला मालक नदीम खान याच्यासह अन्य चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कारवाई सुरू असल्याने इतर आरोपींची नावे सांगण्यास विलंब लागेल असे पोलिसांनी सांगितले