वेगळ्या विदर्भासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By Admin | Updated: July 31, 2014 00:11 IST2014-07-31T00:11:08+5:302014-07-31T00:11:08+5:30
बहुजन समाज पार्टीच्यावतीने पुलगाव येथे मंगळवारी मोटार सायकल रॅली काढून विविध मागण्यांकरिता जनजागृती करण्यात आली़ शिवाय बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला़

वेगळ्या विदर्भासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
वर्धा : बहुजन समाज पार्टीच्यावतीने पुलगाव येथे मंगळवारी मोटार सायकल रॅली काढून विविध मागण्यांकरिता जनजागृती करण्यात आली़ शिवाय बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला़
बसपाद्वारे पुलगाव येथे काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीद्वारे वेगळ्या विदर्भाच्या मागणीबाबत जनजागृती करण्यात आली़ रॅलीत जिल्ह्यातील बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व बहुजन समाजाचे नागरिक यांच्यासह सुरेश दुधे, सुरेश नगराळे, निलेश काळे, कुंदन जांभुळकर, सोनू मेंढे, मनीष गोटे, प्रकाश टेंभुर्णे, विनोद बोरकर, बाबू बिन्दोड, स्रेहल अंबादे, सचिन वासेकर, उत्तम चव्हाण, सुभाष रामटेके, प्रणय चव्हाण यांनी सहभाग घेतला़ यात विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले़(कार्यालय प्रतिनिधी)