वाहनासह चार लाखांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:25 IST2017-12-27T23:25:24+5:302017-12-27T23:25:36+5:30

वायगाव (नि.) येथे दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. यावरून विशेष पथकाने धाड टाकून वाहनासह ४ लाखांचा मुुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली.

Four lakhs of liquor seized with the vehicle | वाहनासह चार लाखांचा दारूसाठा जप्त

वाहनासह चार लाखांचा दारूसाठा जप्त

ठळक मुद्देवायगाव (नि.) येथे दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वायगाव (नि.) येथे दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. यावरून विशेष पथकाने धाड टाकून वाहनासह ४ लाखांचा मुुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली.
शेख अब्दुल नईम अब्दुल गफ्फार रा. स्टेशन फैल वर्धा व समद खान सोहेल खान पठाण रा. वायगाव हे वाहनातून विदेशी दारू आणत असल्याची माहिती मिळाली. यावरून धाड टाकली असता कार क्र. एमएच ३१ सीपी २७६६ मध्ये १७ पेट्या दारू आढळून आली. यात कारसह ४ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पो. उपनिरीक्षक श्रीकांत कडू, गणेश इंगोले, प्रमोद जांभुळकर, गजानन गहुर, गजानन कठाणे, संजय राठोड, धर्मेंद्र अकाली, नितीन ताराचंदी, प्रदीप वाघ यांनी केली.

Web Title: Four lakhs of liquor seized with the vehicle