चार लाखांचा दारूसाठा जप्त

By Admin | Updated: August 15, 2016 00:45 IST2016-08-15T00:45:39+5:302016-08-15T00:45:39+5:30

मालवाहु वाहनातून दारूची अवैध वाहतूक करीत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून केलेल्या कारवाईत....

Four lakhs of liquor seized | चार लाखांचा दारूसाठा जप्त

चार लाखांचा दारूसाठा जप्त

वर्धा : मालवाहु वाहनातून दारूची अवैध वाहतूक करीत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून केलेल्या कारवाईत ४ लाख ३६ हजार ६०० रुपयांची बियर जप्त केली. यात शुभम संजय शिंदे (२१) रा. बोरगाव (मेघे) वर्धा, कर्मा गणेश राखडे (३०) रा. अशोकनगर वर्धा व बादल राखडे रा. अशोकनगर या तिघांवर गुन्हा दाखल केला. यातील कर्मा राखडे यास अटक करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रानुसार, बादल राखडे हा त्याच्या साथीदारांसह वर्धा शहर परिसरात एमएच ३२ बी २४९९ या मालवाहू वाहनाने बियर आणत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे अशोकनगर येथे सापळा रचण्यात आला. नाकाबंदी दरम्यान सदर वाहनाची व आरोपींची झडती घेण्यात आली. यात गाडीमध्ये बियरच्या ६५० एमएलच्या १ हजार ४५२ बाटल्या आढळून आल्या. याप्रकरणी तिघांवरही दारूबंदी तथा मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्या निर्देशानुसार बारवाल, दिवाकर परिमल, अमर लाखे, आनंद भस्मे, दीपक जाधव, वैभव कट्टोजवार, हरीदास काकड, समीर कडवे, अमीत शुक्ला यांनी केली.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Four lakhs of liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.