शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे माजी आमदार झाले राष्ट्रवादीचे उमेदवार; अमर काळे वर्ध्यातून ‘तुतारी’वर लढणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 18:47 IST

मुंबईत जयंत पाटील यांनी केली घोषणा.

वर्धा : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असताना महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा सुटत नव्हता. शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसचे आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश घेतला. त्यानंतर शनिवारी सायंकाळी मुंबई येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काळे यांना वर्धेतून उमेदवारी जाहीर केली आहे.

महायुतीत वर्धेची जागा भाजपच्या वाट्याला, तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आली आहे. भाजप, वंचितने अधिसूचना निघण्यापूर्वीच उमेदवारांची घोषणा केली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार जाहीर केला नव्हता. दुसरीकडे काँग्रेसच्या स्थानिक पुढाऱ्यांनी ही जागा आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी मुंबई, दिल्लीपर्यंत प्रयत्न केले होते. राष्ट्रवादीतही उमेदवारीसाठी चढाओढ सुरू होती. काही दिवसांपासून काँग्रेसचे आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांनीही ‘तुतारी’वर लढण्याची तयारी सुरू केली होती. त्यांनी आठवडाभरापूर्वीच मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींची भेट घेतली होती. मात्र, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला नव्हता. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीविषयी संभ्रम निर्माण झाला होता. 

शुक्रवारी सायंकाळी अमर काळे यांना मुंबई येथे शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर शनिवारी सायंकाळी मुंबई येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमर काळे यांना वर्धा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले. त्यामुळे आता महायुतीचे रामदास तडस आणि महाविकास आघाडीचे अमर काळे यांच्यात चुरशीचा सामना रंगण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच नसणार काँग्रेसचा उमेदवारवर्धा लोकसभा मतदार संघात यावेळी पहिल्यांदाच काँग्रेसचा उमेदवार नसणार आहे. या मतदार संघात आत्तापर्यंत काँग्रेस विरोधात इतर पक्ष लढत आले आहे. त्यात पहिल्यांदा कम्युनिस्ट आणि नंतर भाजपच्या उमेदवारांनी काँग्रेस उमेदवाराला पराभूत केले. मात्र, प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने लढत दिली होती. दरम्यान, २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली. ही आघाडी लोकसभेतही कायम आहे. आघाडीत वर्धा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला गेल्याने यंदा प्रथमच काँग्रेसच्या उमेदवाराशिवाय निवडणूक होणार आहे. मात्र, राष्ट्रवादीचे उमेदवार काँग्रेसचेच माजी आमदार आहेत.

टॅग्स :wardha-pcवर्धा