एक ईव्हीएम मशीन केंद्रातच विसरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:59 IST2019-03-25T22:59:14+5:302019-03-25T22:59:29+5:30

मोरांगणा ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक प्रकार घडला. मतदानानंतर चार वॉर्डांपैकी एका वॉर्डाची ईव्हीएम मशीन मतदान केंद्रात टाकून मतदान अधिकारी व कर्मचारी निघून गेले. झालेला प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी संबंधितांशी संपर्क केला, रात्री साडेआठ वाजता एका वाहनात आलेला एक कर्मचारी ईव्हीएम मशीन घेऊन गेला.

Forgot at an EVM machine center! | एक ईव्हीएम मशीन केंद्रातच विसरले!

एक ईव्हीएम मशीन केंद्रातच विसरले!

ठळक मुद्देकेंद्राध्यक्षाची लगीनघाई : मोरांगणा ग्रा.पं. तील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : मोरांगणा ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक प्रकार घडला. मतदानानंतर चार वॉर्डांपैकी एका वॉर्डाची ईव्हीएम मशीन मतदान केंद्रात टाकून मतदान अधिकारी व कर्मचारी निघून गेले. झालेला प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी संबंधितांशी संपर्क केला, रात्री साडेआठ वाजता एका वाहनात आलेला एक कर्मचारी ईव्हीएम मशीन घेऊन गेला.
येथील ग्रामपंचायतीच्या चार वॉर्डांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. मतदान शांततेत पार पडावे म्हणून चार वर्ग खोल्यांमध्ये चार वॉर्डांच्या ईव्हीएम ठेवण्यात आल्या होत्या. सायंकाळी मतदान पार पडल्यानंतर मतदान प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम मशीन सिल करण्यात आल्या. काही वेळाने ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यासाठी आलेल्या वाहनात बसून अधिकारी व कर्मचारी रवाना झाले. मात्र, घाईगडबडीत वॉर्ड क्रमांक एकची मशीन घेऊन जायचे विसरले.
गावातील काही मंडळींनी काही राहून तर गेले नाही ना म्हणून वर्ग खोलीत डोकावून पाहिले असता वॉर्ड क्र. १ च्या खोलीत ईव्हीएम मशीन आढळून आली. याबाबत हल्लकल्लोळ झाला. काहींनी आमदार अमर काळे यांच्या कानावर तर काहींनी तहसीलदारांना भ्रमणध्वनीवर माहिती दिली तेव्हा कुठे रात्री ८.३० वाजता एका वाहनातून एक कर्मचारी आला व ईव्हीएम मशीन घेऊन गेला.
याबाबत तहसीलदार पवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, मागाहून झोनल मॅनेजर येणार होते व टीमला सोबत नेणार होते. पण, नेमकी एकच ईव्हीएम मशीन का ठेवली या प्रश्नाचे त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

तीन वॉर्डाच्या ईव्हीएम मशीन घेऊन अधिकारी गेले व एका वॉर्डाची ईव्हीएम मशीन तेथेच राहून गेली. त्यामुळे तहसीलदारांना माहिती दिली व तिथे ठिय्या मांडून बसलो. राहिलेली ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यासाठी कोणताही जबाबदार कर्मचारी आला नाही. केवळ वाहनचालक आला व ईव्हीएम मशीन घेऊन गेला. त्यामुळे गडबड तर झाली नाही ना अशी शंका आहे.
- श्यामकांत उमक, रा. मोरांगणा (ख).

Web Title: Forgot at an EVM machine center!