महामार्गाच्या जागेवर वनविभागाचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST2020-06-24T05:00:00+5:302020-06-24T05:00:10+5:30

वनविभागाला वन कर्मचारी निवासस्थान व कार्यालय बांधकामाला जुना सर्व्हे क्र. १०५ (ख) व नीन सर्व्हे क्र. १७८ प्रमाणे आराजी १.२१ हे.आर. जमीन राज्य शासनाकडून देण्यात आली होती. मात्र, वनविभागाने सर्व परिसीमा ओलांडत तब्बल ३ हेक्टर जागेवर अनधिकृतरीत्या कब्जा केला. वनाधिकारी अमोल चौधरी यांनी राष्ट्रीय महामार्गासाठी अस्तित्वात असणारी ३० मीटर जागा विचारात न घेता मधेच अतिक्रमण करून तारेचे कुंपण घातल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

Forest department at the site of the highway | महामार्गाच्या जागेवर वनविभागाचा डल्ला

महामार्गाच्या जागेवर वनविभागाचा डल्ला

ठळक मुद्देहडपली १३ मीटर जागा : नागरिकांची वनविभागावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : तळेगाव, आष्टी, साहूर, द्रुगवाडा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात वनविभागाने १३ मीटर जागा हडप करीत तारेचे कुंपण घातले. नगरपंचायतची जागा हडप करूनही वनविभागाकडून गुन्हे करण्याची धमकी दिली जात होती. याविरुद्ध २०० नागरिकांनी वनविभागावर धडक दिली. याप्रकरणी २२ पत्रकार परिषदेतून अन्यायाला वाचा फोडली.
वनविभागाला वन कर्मचारी निवासस्थान व कार्यालय बांधकामाला जुना सर्व्हे क्र. १०५ (ख) व नीन सर्व्हे क्र. १७८ प्रमाणे आराजी १.२१ हे.आर. जमीन राज्य शासनाकडून देण्यात आली होती. मात्र, वनविभागाने सर्व परिसीमा ओलांडत तब्बल ३ हेक्टर जागेवर अनधिकृतरीत्या कब्जा केला. वनाधिकारी अमोल चौधरी यांनी राष्ट्रीय महामार्गासाठी अस्तित्वात असणारी ३० मीटर जागा विचारात न घेता मधेच अतिक्रमण करून तारेचे कुंपण घातल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या अतिक्रमणामुळे सद्यस्थितीत रस्त्याच्या कामावर परिणाम झाला. राष्ट्रीय महामार्ग विभागाने ६० मीटर लांबीच्या भागातील काम बंद ठेवले.
याची माहिती वनाधिकाऱ्यांना दिल्यावर त्यांनी एक मीटर जागा देण्याची तयारी दर्शविली. मात्र, ही जागा अपुरी असल्यामुळे नागरिक संतप्त झाले.
याचा जाब विचारण्यास वनविभागावर धडकले. यानंतर भाजप शहर अध्यक्ष अ‍ॅड. मनीष ठोंबरे, तालुकाध्यक्ष कमलाकर निंभोरकर, मंगेश बालपांडे, अनिल कठाणे, तुषार खोडे, राहुल कोल्हे, हेमराज खोडे, अ‍ॅड. प्रकाश गायकवाड, प्रतीक माणिकपुरे, चंदू मदनकर, गोपाल चन्ने, बबलु गवळी, रवी वानखडे, राहुल कठाणे, आशीष ठाकरे, शुभम गवळी आदींनी तहसीलदार आशीष वानखेडे यांची भेट घेत न्यायाची मागणी केली. त्यानंतर शहीद स्मारकात पत्रकार परिषद घेऊन वनविभागावर अतिशय गंभीर आरोप करण्यात आले.

वनविभागाने स्वत:च अतिक्रमण करून रस्ता ताब्यात घेतला. वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी दंडेलशाही करीत आहेत. एसआरपी बोलावून गुन्हे दाखल करायची धमकी देतात. सामान्य जनतेवर अन्याय करून वनविभाग लोकशाहीचा गळा घोटत आहे. त्यांच्या या कृत्याचा जाहीर निषेध करून रस्त्याचे अतिक्रमण तत्काळ न काढल्यास रास्ता रोको आंदोलन करू.
- अ‍ॅड. मनीष ठोंबरे, नगरसेवक तथा शहर अध्यक्ष, भाजप, आष्टी (शहीद).

वनविभागाने कुठलेही अतिक्रमण केलेले नाही. भूमि अभिलेख विभागाकडे मोजणी टाकली. मोजणीनंतर जी स्थिती राहील, ती वनविभाग विचारात घेईल.
- अमोल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, आष्टी (शहीद).

भूमि अभिलेखच्या निर्णयावर रस्त्याचे भविष्य अवलंबून राहणार आहे. मोजणीच्या दिवशी परिसरातील रहिवासी हजर राहू वनविभागाविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार.
- अ‍ॅड. प्रकाश गायकवाड, आष्टी (शहीद).

Web Title: Forest department at the site of the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.