अन्न महामंडळाच्या गोदामांचा स्ट्राँग रूमकरिता वापर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 23:51 IST2019-03-17T23:50:31+5:302019-03-17T23:51:24+5:30
लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट ठेवण्यासाठी भारतीय खाद्य निगमचे गोदाम स्ट्राँग रुम म्हणून वापरण्यात येते. यासाठी भारतीय अन्न महामंडळाचे गोदाम अधिग्रहित करण्यात येते. मात्र, सद्यस्थितीत गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात धान्यसाठा आहे.

अन्न महामंडळाच्या गोदामांचा स्ट्राँग रूमकरिता वापर करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट ठेवण्यासाठी भारतीय खाद्य निगमचे गोदाम स्ट्राँग रुम म्हणून वापरण्यात येते. यासाठी भारतीय अन्न महामंडळाचे गोदाम अधिग्रहित करण्यात येते. मात्र, सद्यस्थितीत गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात धान्यसाठा आहे.
स्ट्रॉग रुमची व्यवस्था करण्यासाठी भारतीय खाद्य निगमने हे गोदाम तत्काळ खाली करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिलेत. जिल्हाधिकारी यांनी अन्न महामंडळाच्या गोदामाला भेट देत पाहणी केली. यावेळी पोलिस अधीक्षक बसवराज तेली, अपर जिल्हाधिकारी संजय दैने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड व खाद्य निगमचे अधिकारी उपस्थित होते.
यावर्षी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारींना त्यांनी केलेल्या मतदानाची खात्री पटण्यासाठी ईव्हीएम मशीन सोबत व्हीव्हीपॅट मशीन राहणार आहे. त्यामुळे यावेळी जास्त जागा लागणार आहे. तसेच मतदान केंद्राची संख्या वाढल्यामुळे आणि उमेदवारांची संख्या १५ पेक्षा जास्त असल्यास अधिकचे बॅलेट युनिट वाढण्याची शक्यता लक्षात घेता स्ट्राँग रुमसाठी जागा निश्चित करावी. गोदामाच्या सर्व खिडक्या आणि व्हेंटिलेशन बंद करावे. गोडाऊनचे छताची गळती बंद करुन घ्यावी. पोलिसांनी स्ट्राँग रुमच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवाव्या, त्यानुसार सुरक्षेच्या दृष्टीने कठडे उभारावे. गोदामाच्या पसिरात येणाऱ्या रेल्वे मार्गाचे गेट बंद करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.स्ट्राँग रुमच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात राहणाºया केंद्रीय राखीव सुरक्षा बलाच्या जवानांसाठी शौचालय, स्नानगृह, पिण्याचे आणि वापराचे पाणी आदी मूलभूत सुविधा करण्यात याव्या, सर्व अधिकाऱ्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहून सर्व स्ट्राँगरुमची व्यवस्था करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.