लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील गोविंदपूर शिवारात भरधाव वाहन रस्तादुभाजकावर चढून उलटले. यात दोघे जण जखमी झाले. हे वाहन चांदा आॅर्डनन्स फॅक्टरीचे असल्याचे सांगण्यात येते. सोमवारी सायंकाळी उशीरा ही घटना घडली.चंद्रपूर येथील चांदा आॅर्डनन्स फॅक्टरीचे वाहन नागपूरवरून चंद्रपूरच्या दिशेने जात होते. हे वाहन समुद्रपूर तालुक्यातील गोविंदापूर शिवारात आले असता वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना वाहन रस्ता दुभाजकावर चढून वाहन उलटले.यात वाहनातील अशोक शिवशंकर यादव रा. नागपूर व सुर्दशन सुदाम पटेल चांदा हे दोघे जखमी झाले. अपघाची माहीती मिळताच जाम महामार्ग पोलीस चौकीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक भरत कºहाडे, कांचन नवाते, किशोर लभाने, विनोद थाटे, प्रविण चव्हान, दीपक जाधव, प्रवीण बागडे यांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयाकडे रवाना केले.हा अपघात इतका भीषण होता की वाहनाचा चुराडा झाला. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.
भरधाव वाहन उलटले; दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:41 IST
तालुक्यातील गोविंदपूर शिवारात भरधाव वाहन रस्तादुभाजकावर चढून उलटले. यात दोघे जण जखमी झाले. हे वाहन चांदा आॅर्डनन्स फॅक्टरीचे असल्याचे सांगण्यात येते. सोमवारी सायंकाळी उशीरा ही घटना घडली.
भरधाव वाहन उलटले; दोघे जखमी
ठळक मुद्देनागपूर-चंद्रपूर मार्गावरील गोविंदपूर शिवारातील घटना