भरदुपारी एकाच इमारतीतील तीन घरे फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 23:50 IST2019-03-16T23:49:40+5:302019-03-16T23:50:03+5:30
नजिकच्या नालवाडी भागातील बँक आॅफ कॉलनीतील श्री रेसिडेन्सीमधील तीन सदनिकांचे अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरांमधून लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली आहे.

भरदुपारी एकाच इमारतीतील तीन घरे फोडली
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नजिकच्या नालवाडी भागातील बँक आॅफ कॉलनीतील श्री रेसिडेन्सीमधील तीन सदनिकांचे अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरांमधून लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली आहे.
प्राप्त माहितीनुसार, परिसरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने श्री रेसिडेन्सीतील माधुरी विनोद एटकोटवार, प्रशांत अरुण लोहकरे व अनिल नामदेव बोरकर यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून त्यांच्या घरातून रोख व सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. चोरट्याने एटकोटवार यांच्या घरातून सोन्याचे दागिने, लोहकरे यांच्या घरातून सुमारे १३ हजार रुपये रोख व अनिल बोरकर यांच्या घरातून रोख व आदी साहित्य चोरून नेले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच रामनगर पोलिसांना माहिती देण्यात हाली. माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्यातील विनोद राऊत, आकाश चुंगडे, शरद मून, अविनाश नवराते यांची घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनास्थळी श्वास पथक व ठसे तज्ज्ञांच्या चमूला पाचारण करण्यात आले होते. या घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली असून वृत्तलिहिस्तोवर फिर्यादीची तक्रार घेऊन गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.