शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

वर्धा जिल्ह्यात पाचशे क्विंटल सोयाबीन भिजले; अवकाळीने दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 12:07 IST

Wardha News Rain सोमवारी दुपारी अवकाळी पावसाने दणका दिलाच. अचानक बरसलेल्या मुसळधार पावसाने पाचशे क्विंटलवर सोयाबीन ओले झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचीही चांगलीच दाणादाण झाली.

शेतकऱ्यांचा माल उघड्यावर, व्यापाvचा शेडमध्येलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: निसर्गकोपाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर पावसाचा मारा अद्यापही सुरुच आहे. मोठ्या मेहनतीने हाती आलेले थोडेथोडके सोयाबीन वर्ध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये विकण्यासाठी आणले असता सोमवारी दुपारी अवकाळी पावसाने दणका दिलाच. अचानक बरसलेल्या मुसळधार पावसाने पाचशे क्विंटलवर सोयाबीन ओले झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचीही चांगलीच दाणादाण झाली.मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीनची पेरणी केली होती. सुरुवातीला सोयाबीनची जोमात वाढ झाल्याने यंदा सोयाबीनचे उत्पन्न भरघोस होण्याची अनेकांना आशा होती. पण, सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले. सध्या एकरी तीन ते पाच पोत्यापर्यंत उतारा असल्याने शेतकऱ्यांचा खर्चही भरुन निघणे कठीण आहे. दोन दिवसाच्या सुटीनंतर आणि सोमवार आठवड्याचा पहिला दिवस असल्याने वर्ध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन विकायला आणले होते. शेडमध्ये व्यापाऱ्यांचा माल साठवून असल्याने शेतकऱ्यांना उघड्यावरच आपला माल टाकावा लागला. अशातच दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सोयाबीन ओले झाले.यात काही मालाचा लिलाव झाला होता तर काही मालाचा लिलाव बाकी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ज्या मालाचा लिलाव बाकी होता त्या शेतकऱ्यांना मात्र यार्डात सोयाबीन आल्यानंतरही नुकसानीचा सामना करावा लागला.

आता शेतमाल विक्रीला येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढणार असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात शेतकऱ्यांच्या मालाकरिता तात्काळ शेडची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.सहा एकरात सोयाबीनची लागवड केली होती. अतिपावसाने पीक खराब घाल्याने २६ कट्टे सोयाबीन झाले. ते वाळल्यानंतर केवळ दहा कट्टेच सोयाबीन शिल्लक राहिले. ते विकण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये आणले असता आजच्या अवकाळी पावसाने ते पूर्णत: भिजले आहे. त्यामुळे आणखीच अडचणीत भर पडली आहे.- गणपत पोटे, शेतकरी, इसापूर.

बाजार समितीमध्ये आलेल्या आजच्या मालाचा लिलाव झाला होऊन बऱ्याच मालाचा काटाही आटोपला होता. काही माल भरणे सुरु असतानाच पाऊस आल्याने जवळपास दीडशे ते दोनशे क्विंटल सोयाबीन ओले झाले. लिलाव प्रक्रिया आटोपल्याने शेतकऱ्यांचे नुकसान टळले. येथील तीन शेड भाजीविक्रेत्यांना दिल्याने अडचण होत आहे. त्यामुळे ते शेड खाली करुन द्यावे, अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.- समीर पेंडके, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, वर्धा.

ओट्यांना शेडची प्रतीक्षाचबाजार समितीत कित्येक दिवसांपासून ओटे बांधण्यात आले आहे पण, त्यावर अद्यापही शेड उभारले नाहीत. येथील तीन शेड ठोक भाजीविक्रेत्यांना उपलब्ध करुन दिले आहेत. मध्यंतरी आलेल्या पावसाने त्यांचा कांदाही भिजला होता. सध्या असलेल्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचा माल ठेवला असून शेतकऱ्यांना आपला माल उघड्यावर ठेवावा लागत आहे. बाजार समितीत व्यापाऱ्यांचा माल शेडमध्ये आणि शेतकऱ्यांचा उघड्यावर ही बाब नेहमीचीच असून शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे बाजार समितीने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :agricultureशेती