नाचणगावात पहिल्या महिला सरपंचपदासाठी जोरदार रस्सीखेच

By Admin | Updated: May 19, 2014 23:46 IST2014-05-19T23:46:47+5:302014-05-19T23:46:47+5:30

राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे गाव असलेल्या नाचणगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद प्रथमच अनुसूचित जातीतील महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने ग्रामपंचायत

The first woman to be in the dance cadet | नाचणगावात पहिल्या महिला सरपंचपदासाठी जोरदार रस्सीखेच

नाचणगावात पहिल्या महिला सरपंचपदासाठी जोरदार रस्सीखेच

पुलगाव : राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे गाव असलेल्या नाचणगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद प्रथमच अनुसूचित जातीतील महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने ग्रामपंचायत स्थापनेनंतर पहिल्यांदा सरपंचपदाची माळ महिलेच्या गळ्यात पडणार आहे. यासाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच बघायला मिळत आहे. देवळी तालुक्यात नाचणगाव सर्वात मोठी १७ सदस्यीय ग्रापंचायत आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांच्या या गावाला राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे. २३ मार्च रोजी ग्रामपंचायती निवडणूक पार पडली. येत्या २२ मे रोजी महिला सरपंचपदाची निवड होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक पक्षाच्या चिन्हावर झाल्या नसल्यातरी काँग्रेस समर्थित ६, बसपा २, भाजपा ४, सेना २, अपक्ष ३ असे पक्षीय बलाबल आहे. यामध्ये काँग्रेस गटातर्फे सुनिता जुनघरे यांचे नाव पुढे येत आहे. भाजपा-सेनेकडे अनु. जातीची महिला सदस्य नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे. तर बसपाच्या सविता गावंडे भाजपाशी हातमिळवणी करून बाजी मारतील काय, यासाठी राजकीय उठाठेव सुरू आहे. काही महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. ना. रणजित कांबळे प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेऊन आहेत. काँग्रेसचे हे बुरूज हळूहळू ढासळत आहे. त्यामुळे सत्ता आपल्या हाती राहावी, असे नेत्यांना वाटते. पहिली सरपंच कोण बनणार, याकडे गामस्थांचे लक्ष आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: The first woman to be in the dance cadet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.