तनूज मुलांमधून तर स्वराली मुलींतून प्रथम

By Admin | Updated: May 20, 2014 23:53 IST2014-05-20T23:53:25+5:302014-05-20T23:53:25+5:30

जिल्ह्यात सीबीएसई (सेंट्रल बोर्ड आॅफ सेंकडरी एज्युकेशन)चा निकाल सोमवारी जाहीर झाला. यात लॉएड्स विद्या निकेतन भुगावचा तनूज देशमुख हा मुलांंमधून तर मुलींमधून

First of the tunoja boys, from self girls | तनूज मुलांमधून तर स्वराली मुलींतून प्रथम

तनूज मुलांमधून तर स्वराली मुलींतून प्रथम

जिल्ह्याचा उत्कृष्ट निकाल : सीबीएसई परीक्षेतील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण

वर्धा : जिल्ह्यात सीबीएसई (सेंट्रल बोर्ड आॅफ सेंकडरी एज्युकेशन)चा निकाल सोमवारी जाहीर झाला. यात लॉएड्स विद्या निकेतन भुगावचा तनूज देशमुख हा मुलांंमधून तर मुलींमधून अग्रग्रामी कॉन्व्हेंटची स्वराली घोडखांदे प्रथम आली आहे. या अभ्यासक्रमाच्या असलेल्या सर्वच शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. जिल्ह्यात या अभ्यासक्रमाच्या एकूण सहापेक्षा अधिक शाळा आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क) न्यू इंग्लिश अ‍ॅकेडमी आॅफ जिनिअसचे ३६ विद्यार्थी उत्तीर्ण वर्धा - वर्धा एज्युकेशन सोसायटी वर्धा संचालित न्यु इंग्लिश अ‍ॅकेडमी आॅफ जिनिअसच्या वर्ग दहावीच्या पहिल्या तुकडीने १०० टक्के निकाल दिला. संस्थेने सुरू केलेल्या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या या शाळेतून एकूण ३६ विद्यार्थी बसले होते. देवांग दीपक वैद्य, प्रज्वल प्रशांत धारपूरे, पुजा विनायक ढबाले यांनी ९५ टक्के गुण मिळविले. अग्रग्रामी कॉन्व्हेंट स्कूल म्हसाळाचे यश वर्धा - अग्रग्रामी कॉन्व्हेंट स्कूल मसाळा (सीबीएसई) या शाळेच्या विद्यार्थ्यांनी दहावी सीबीएसई बोर्डात उल्लेखनिय कामगिरी केली. अग्रग्रामी कॉन्व्हेंट स्कूल, म्हसाळा येथील दहावीच्या पहिल्या बॅचचा निकाल १०० टक्के लागला. स्वराली घोडखांदे हिला ९७ टक्के मिळून ती शाळेतून पहिली व जिल्ह्यातून दुसरी आली. तसेच आशुतोष जोगे हा विद्यार्थी ९३ टक्के घेवून शाळेतून दुसरा आला. साक्षी टेनपे हिने ९२ टक्के घेवून तिसरी आली. दहावी सीबीएसई बोर्डात एकूण ४१ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यामध्ये तीन ए वन आणि १३ विद्यार्थी ए टू श्रेणीत उत्तीर्ण झालेत मुलांमध्ये पियूष उजवणे तर मुलींमधून मेघा सुपारे प्रथम हिंगणघाट- सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. स्थानिक सेंट जॉन हायस्कूल, या शाळेने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखून १०० टक्के निकाल दिला. शाळेतून या परीक्षेला एकूण ५९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून पूर्ण विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेतून प्रथम स्थानावर ९२.०२ टक्के (१० सीजीपीए) गुण घेऊन पियूष विलासराव उजवने तर ९१.०८ टक्के (१० सीजीपीए) गुण घेऊन द्वितीय स्थानावर राज श्यामसुंदर हुरकट हा आहे. मेघा नारायण सुपारे (९.८ सीजीपीए), लहू शंकर गुजरकर (९.८ सीजीपीए), संयम प्रदीप हरणे (९.८ सीजीपीए), मुकुंद नवलकिशोर सारडा (९.८ सीजीपीए), मिथिलेश शेषराव म्हैसके (९.८ सीजीपीए), मयुरी हरीशचंद्र ढोले (९.४ सीजीपीए), उन्नती रविंद्र लोडा (९.४ सीजीपीए), समृध्दी अनिल तरोडकर (९.४ सीजीपीए), अथर्व अनिल कारमोरे (९.४ सीजीपीए), श्रेयश गौतम कोठारी (९.४ सीजीपीए), खुशबू नरेश पाखरानी (९.२ सीजीपीए), साक्षी रवीशेखर धकाते (९.२ सीजीपीए), अनिकेत दामोधर देवतळे (९.२ सीजीपीए), दिप्ती दिनेश आर्या (९ सीजीपीए), प्राजक्ता विलास राऊत (९ सीजीपीए), श्रेयश रमेश गुप्ता (९ सीजीपीए), पियुष दुर्गादास मोटवाणी (९ सीजीपीए), चिराग संजयकुमार तन्ना (९ सीजीपीए), अश्विन सुरेश वाने (९ सीजीपीए) गुण घेतले. शाळेतून ५९ विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी १० सीजीपीए, १९ विद्यार्थी नऊ सीजीपीएच्या वर तसेच २० विद्यार्थी आठ सीजीपीए मध्ये आहेत.

Web Title: First of the tunoja boys, from self girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.