जिल्ह्यात प्रथमच स्पर्धा परीक्षा संमेलन
By Admin | Updated: March 14, 2015 02:03 IST2015-03-14T02:03:55+5:302015-03-14T02:03:55+5:30
स्पर्धा परीक्षेबद्दल जागृती करण्याच्या उद्देशाने विवेकानंद अभ्यासिका विद्यार्थी परिवारातर्फे प्रथमच स्पर्धा परीक्षा संमेलन घेण्यात आली़ गुरूवारी पार पडलेल्या ...

जिल्ह्यात प्रथमच स्पर्धा परीक्षा संमेलन
हिंगणघाट : स्पर्धा परीक्षेबद्दल जागृती करण्याच्या उद्देशाने विवेकानंद अभ्यासिका विद्यार्थी परिवारातर्फे प्रथमच स्पर्धा परीक्षा संमेलन घेण्यात आली़ गुरूवारी पार पडलेल्या या अभिनव संमेलनाला जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी व पालकांनी हजेरी लावली़
पहिल्या स्पर्धा परीक्षा संमेलनाचा प्रारंभ ग्रंथदिंडीने करण्यात आली. नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन झाले़ शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. संमेलनाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कानवरू प्रसाद यांच्या हस्ते प्रा. सुरेखा देशमुख यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले़ संमेलनात उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कानवरू प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना यशाचे तीन मंत्र सांगितले. लेखाधिकारी काळे यांनी अभ्यास कसा कवाला, याबद्दल मार्गदर्शन केले. मिरज मनपाचे उपायुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी सर्जनशील प्रशासक कसा असावा, स्पर्धा परीक्षेतील सोपा व कठीण भाग सोप्या भाषेत सांगितला़ विस्तार अधिकारी अमोल चिरूटकर यांनी स्पर्धा परीक्षा क्रांती या विषयावर मार्गदर्शन केले़ युवकांना प्रेरणा देण्यासाठी युवा अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अचल मलकापुरे यांनी सळसळत्या रक्ताचा वापर जीवन घडविण्यासाठी करावे, असे सांगितले. परिविक्षाधीन अधिकारी अविनाश विरूळकर यवतमाळ यांनी कुठेही न भटकता केंद्रीत राहूना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा, असा कानमंत्र दिला.
किरण वैद्य, प्रा. विजय गाडगे यांनीही मार्गदर्शन केले़ कार्यक्रमात योगेश वानखेडे यांनी ठराव मांडले. आढावा अनिल मानकर यांनी घेतला. समारोपीय भाषण प्रा. सुरेखा देशमुख यांनी केले. संमेलनाचे संचालन अरुण घोटेकार व निलेश बिडकर यांनी केले तर आभार आशिष खुनकर यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)