गौरव काचोळे ओबीसी प्रवर्गात प्रथम

By Admin | Updated: June 4, 2017 17:06 IST2017-06-04T17:06:18+5:302017-06-04T17:06:18+5:30

रा.सु. बिडकर कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थी गौरव अरुण काचोळे याने राज्याच्या सीईटी परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून पीसीबी गटात २०० पैकी १८७ गुण प्राप्त करीत राज्यात प्रथम आला.

First in Gaurav Kachole OBC category | गौरव काचोळे ओबीसी प्रवर्गात प्रथम

गौरव काचोळे ओबीसी प्रवर्गात प्रथम

आॅनलाईन लोकमत
हिंगणघाट (वर्धा) : रा.सु. बिडकर कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थी गौरव अरुण काचोळे याने राज्याच्या सीईटी परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून पीसीबी गटात २०० पैकी १८७ गुण प्राप्त करीत राज्यात प्रथम आला. तसेच अभियांत्रिकी पूर्व प्रवेश परीक्षेत २०० पैकी १६२ गुण प्राप्त करीत जिल्ह्यातुन प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. गौरवचे वडील अरुण काचोळे हे वडनेर येथील नि.मु. घटवाई कनिष्ठ महाविद्यालयात गणित विषयाचे प्राध्यापक असुन आई जयश्री गृहिणी आहे.

Web Title: First in Gaurav Kachole OBC category