उभ्या ट्रॅव्हल्सला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:06 IST2018-08-12T23:06:07+5:302018-08-12T23:06:25+5:30
वर्धा-नागपूर मार्गावरील केळझर येथे उभ्या ट्रॅव्हल्सला शनिवारी रात्री उशीरा अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण करून संपूर्ण ट्रॅव्हल्सला आपल्या कवेत घेतले. यात एम.एच. २९ ए. डब्ल्यू. ४४९९ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सचा कोळसा झाला असून घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.

उभ्या ट्रॅव्हल्सला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : वर्धा-नागपूर मार्गावरील केळझर येथे उभ्या ट्रॅव्हल्सला शनिवारी रात्री उशीरा अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण करून संपूर्ण ट्रॅव्हल्सला आपल्या कवेत घेतले. यात एम.एच. २९ ए. डब्ल्यू. ४४९९ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सचा कोळसा झाला असून घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.
नजीकच्या केळझर येथे गावाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला एम. एच. २९ ए. डब्ल्यू. ४४९९ क्रमांकाची ट्रॅव्हल्स गत दोन दिवसांपासून उभी होती. शनिवारी रात्री उशीरा या ट्रॅव्हल्सला अचानक आग लागल्याचे परिसरातील नागरिकांना दिसून आले. घटनेची माहिती पोलिसांना देत अग्निशमन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस व अग्निशमनबंब घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने अग्निशमन दलाचे जवान व पोलिसांनी आगीवर पाण्याचा मारा करून तासभऱ्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. आग लागली त्यावेळी वाहनात कुणीच नसल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी जमादार वामन घोडे, सुरेश शिरोडे, किशोर कापडे यांनी पंचनामा केला. वृत्तलिहिस्तोवर आग नेमकी कशी लागली हे कळू शकले नाही. घटनास्थळी बघ्याची गर्दी होती.