शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

अखेर देवळीच्या रुग्णालयाला मिळाले वैद्यकीय अधीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 5:00 AM

ग्रामीण रुग्णालयाच्या निर्मितीनंतर मागील पाच ते सहा वर्षांपासून येथील ग्रामीण रुग्णालयाचा डोलारा वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकाऱ्याविनाच सुरु होता. रुग्णालयाचा कारभार एक ते दोन शिकावू वैद्यकीय अधिकारी व काही मोजक्या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर सुरु होता.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्या दुर्लक्षीतपणामुळे अनियमिततेला मोठ्या प्रमाणात वाव मिळत होता.

ठळक मुद्देनागरिकांची प्रतीक्षा संपली : कोलमडलेली आरोग्य व्यवस्था होणार सुरळीत

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : दीर्घ कालावधीच्या प्रतिक्षेनंतर देवळी येथील ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय अधीक्षक मिळाले आहे. या पदासाठी दोन दिवसांपूर्वी डॉ. आशिष लांडे यांनी पूर्णवेळ अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला आहे. त्यामुळे देवळीकरांची प्रतीक्षा संपली असून आरोग्य व्यवस्थेला चालना मिळणार असल्याची अपेक्षा आहे.ग्रामीण रुग्णालयाच्या निर्मितीनंतर मागील पाच ते सहा वर्षांपासून येथील ग्रामीण रुग्णालयाचा डोलारा वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकाऱ्याविनाच सुरु होता. रुग्णालयाचा कारभार एक ते दोन शिकावू वैद्यकीय अधिकारी व काही मोजक्या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर सुरु होता.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्या दुर्लक्षीतपणामुळे अनियमिततेला मोठ्या प्रमाणात वाव मिळत होता. त्यामुळे याठिकाणी पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक नेमण्यासाठी अनेक वर्षाची मागणी होती. नव्याने रुजू झालेले डॉ. लांडे यांच्यासमोर रुग्णालयासंबंधित अनेक आव्हाने उभी आहेत. रुग्णालयात अजूनही अनुभवी वैद्यकीय अधिकारी व निकषाप्रमाणे परिचारीका व कर्मचाºयांची कमतरता आहे. रुग्णालयातील क्ष-किरण मशीन जुनाट व नादुरुस्त असून दुसºया रुग्णालयाच्या वापरातील आयात करण्यात आली आहे. शवविच्छेदनाची वास्तू वापर होण्यापूर्वीच मोडक्या स्थितीत आली आहे. या वास्तूलगतच झाडाझुडपांनी वेढले असल्याने ही वास्तू हरविलेल्या स्थितीत आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांना आजू-बाजुच्या घरांचा आसरा घ्यावा लागतो आहे.रुग्णालयाला जडला ‘रेफर’चा आजाररुग्णालयाची वास्तू सुसज्ज असली तरी याठिकाणी परिसरातील दाखल होणाºया रुग्णांना व्यवस्थेअभावी जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा सावंगी येथील रुग्णालयाचा रस्ता दाखविला जात आहे. रुग्णालयात रुग्णवाहिकेची व्यवस्था नसल्याने कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेच्या रुग्णांसोबतच अतीमहत्त्वाच्या असलेल्या रुग्णांची फरपट होत आहे.रुग्णालय परिसरात कचऱ्याचे साम्राज्यरुग्णालय परिसरात स्वच्छतेचा अभाव असून सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची अडचण होत आहे. रात्रीच्या सुमारास रुग्णालय ओस पडल्याचे दिसते. रुग्णांना रुग्णालयात येताना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.नवीन वैद्यकीय अधीक्षकांपुढे आव्हानरुग्णालय परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, झाडझुडपांचा वेढा आहे. तसेच रुग्णवाहिकेची सुविधा नाही, आदी विविध समस्यांचा डोंगर उभा असल्याने नव्यानेच रुजू झालेल्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशिष लांडे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे आहे.

टॅग्स :doctorडॉक्टर