अखेर आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

By Admin | Updated: May 29, 2014 02:40 IST2014-05-29T02:40:07+5:302014-05-29T02:40:07+5:30

बलात्काराचा प्रयत्न झाल्याची तक्रार घेऊन पीडित अंगावरील कपडे फाटलेल्या अवस्थेत ठाण्यात गेली ..

Finally, the crime of molestation against the accused | अखेर आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

अखेर आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

सिंदी(रेल्वे) : बलात्काराचा प्रयत्न झाल्याची तक्रार घेऊन पीडित अंगावरील कपडे फाटलेल्या अवस्थेत ठाण्यात गेली मात्र पोलिसांनी नेहमीप्रमाणे अवमानवीयतेचा परिचय देत केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करुन हात झटकले. यामुळे संतप्त गावकर्‍यांनी सर्व पक्षीयनेत्यांच्या नेतृत्त्वात बुधवारी सिंदी(रेल्वे) पोलीस ठाणे गाठून आपला रोष व्यक्त केला. अखेर वर्धेचे उपविभागीय पोलीस अधिकारी वानखेडे यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने रोष शांत झाला. मात्र ठाणेदाराची पाठराखण करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पीडिताच्या वडिलाने मंगळवारी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली. तरीही कारवाई झाली नसल्याने गावकर्‍यांनी आपला रोष व्यक्त केला.

सिंदी ते सेलडोह मार्गावर रविवारी भरदुपारी सव्वाबारा वाजताच्या दरम्यान बारावी इयत्तेत गेलेली सिंदीलगतच्या हळदगाव ता. हिंगणा जि. नागपूर येथील विद्यार्थिनी शिकवणीसाठी सिंदी येथे गेली होती. हळदगावकडे ती परत जाताना वाटेत चेहरा झाकून असलेला एक इसम तिच्याजवळ दुचाकीने आला. त्याने तिच्या सायकलला धक्का देत खाली खाली पाडले. तिने बचावाकरिता आरडा ओरड केली, पण रस्ता निर्मनुष्य होता. ती प्रतिकार करीत असल्याचे पाहुन त्याने तिला मारहाण केली. तसेच तिच्या अंगावरील कपडे फाडले. पीडिताने जोरदार प्रतिकार केल्याने सदर इसमाच्या चेहर्‍यावरील दुपट्टा खाली पडल्याने त्याचा चेहरा पाहता आला. दरम्यान सिंदीकडून सेलडोहकडे ऑटो येत असल्याचे पाहुने सदर इसमाने तेथून पळ काढला. ऑटोतील काहींनी जवळचे कपडे मुलीला दिले आणि सिंदी (रेल्वे) पोलीस ठाण्यात आणले. ठाण्यात आल्यावर या मुलीने घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी मात्र अदखलपात्र गुन्ह्याचा सोपस्कार पार पाडला. पोलीस ठाण्यात महिला कर्मचारी नसल्याने तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात दिरंगाई झाली. सिंदीत वैद्यकीय अधिकारी नसल्याने तिला वैद्यकीय तपासणीकरिता नंतर सेलू येथे पाठविण्यात आले. पुढील कोणतीही कारवाई पोलिसांकडून झालेली नसल्यामुळे गावकर्‍यांचा पोलिसांविषयी संताप वाढला. आंदोलनात नगराध्यक्ष पुष्पा सोनटक्के, नगरसेविका जिजा तळवेकर, इंदिरा मसराम, मनाषा पेटकर, सुनिता कलोडे, कमला वाघमारे तसेच विविध संघटनेच्या पदाधिकार्‍यासह गावातील असंख्य नागरिक सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)

Web Title: Finally, the crime of molestation against the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.