शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

अद्भुत कलाकृतींनी साकारला फिल्मी ‘फ्युजन शो’

By admin | Updated: July 28, 2014 23:41 IST

लोकमत युवा नेक्स्ट व कॉलेज आॅफ अ‍ॅनिमेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेन्टर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने फिल्मी फ्युजन, फिल्म मेकिंगवर आधारित अद्भुत असा फिल्मी फ्युजन शो वर्धा शहरार पार पडला.

युवा नेक्स्टचा उपक्रम : चित्रकार विजय राऊत यांनी दिले प्रशिक्षणवर्धा : लोकमत युवा नेक्स्ट व कॉलेज आॅफ अ‍ॅनिमेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेन्टर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने फिल्मी फ्युजन, फिल्म मेकिंगवर आधारित अद्भुत असा फिल्मी फ्युजन शो वर्धा शहरार पार पडला. स्थानिक दादाजी धुनिवाले सभागृह येथे या फिल्मी शो ला युवावर्गच नाही तर आबालवृद्धांनी उपस्थिती दर्शवित उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सेमिनार म्हटले की अनेकांना ते कंटाळवाणे वाटते. परंतु हा सेमिनार याला अपवाद ठरला. अ‍ॅनिमेशन फिल्म मेकींगवर आधारित हा सेमिनार मनोरंजक आणि माहितीपूर्ण असल्याने प्रेक्षकांची दाद मिळवून गेला. अ‍ॅनिमेशन कॉलेज अमरावती चे संचालक विजय राऊत, प्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट सुधीर वानखडे व महाविद्यालयाच्या ४० विद्यार्थ्यांनी आपल्या नाविण्यपूर्ण कलाकृतीने सर्वांना खिळवून ठेवले. फिल्म मेकिंगसाठी आवश्यक माहिती त्यांनी प्रात्यक्षिकासह दिली. विजय राऊत यांनी अ‍ॅनिमेशन आणि व्ही.एन.एक्स आणि फ्युचर आर्ट संदर्भात माहिती दिली. या क्षेत्रात आर्ट, इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञानाचा जागतिकस्तरावर कशाप्रकारे वापर होतो हे डिजीटल प्रेझेन्टेशनसह दाखविले. उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी मेडिकल, इंजिनिअरींग, आर्ट, कॉमर्स, सायन्स अशा पारंपारिक अभ्यासक्रमासोबत याची जोड देण्याचे सांगितले. जगात नेमके काय सुरू आहे, फ्युचरकरिता विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे याचा त्यांनी उलगडा केला. तसेच शीघ्र ड्रार्इंग आणि पेन्टींगची प्रचिती देत प्रेक्षकांना अनोखा अनुभव दिला. सुधीर वानखडे यांनी फिल्मचा आवाज कसा दिला जातो याचे डबिंग करुन दाखविले. ‘बळी बळी राजाचा’ हे मायमिंग नाट्य सादर केले. नृत्य, हॉलीवूड फिल्मसाठी कॅरेक्टर कसे तयार केल्या जातात, कुठल्या स्तरावर ते अ‍ॅक्टींग करतात याचा अप्रतिम प्रयोग सादर केला. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना विविध मार्ग उपलब्ध असताना फिल्म अ‍ॅनिमेशन हे एक नव दालन असल्याचा या सेमिनारचा सुर होता.कार्यक्रमाला सुनील बुरांडे, संजय इंगळे तिगावकर, ज्योती भगत, संगिता इंगळे, प्रदीप वर्मा, अजय पळसापुरे, श्रीकांत बिजवार यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांसाठी एक नवीन संधी उपलब्ध करुन देणारा कार्यक्रम होता. नोकरीच्या संधीबाबत राऊत यांनी माहिती दिली. यावेळी युवा नेक्स्ट संयोजक रंजित कांबळे, सतीश कांबळे, तुषार पाटील, राजेश चोपडे आदींनी सहकार्य केले.(उपक्रम प्रतिनिधी)