लसीकरणाचा टप्पा गाठतोय पन्नास हजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 23:30 IST2021-03-25T05:00:00+5:302021-03-24T23:30:17+5:30
शासकीय व खासगी लसीकरण केंद्रांवरून देण्यात येणारी कोविड प्रतिबंधात्मक लस ही पूर्णपणे सुरक्षित व कोरोना मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त ठरणारी असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरुवातीला केवळ सहा केंद्रांवरून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. तर नंतर लसीकरण केंद्रांवर नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात टप्प्या टप्प्याने लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आली.

लसीकरणाचा टप्पा गाठतोय पन्नास हजारी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील शासकीय व खासगी लसीकरण केंद्र गाठून अतिजोखमीच्या गटासह वयोवृद्ध व्यक्ती स्वयंस्फूर्तीने कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घेत आहेत. २३ मार्चपर्यंत जिल्ह्यातील तब्बल ४५ हजार २९३ व्यक्तींनी कोविडच्या प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोज घेतला असून लवकरच वर्धा जिल्हा लसीकरणाचा पन्नास हजाराचा टप्पा गाठणार आहे.
शासकीय व खासगी लसीकरण केंद्रांवरून देण्यात येणारी कोविड प्रतिबंधात्मक लस ही पूर्णपणे सुरक्षित व कोरोना मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त ठरणारी असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरुवातीला केवळ सहा केंद्रांवरून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. तर नंतर लसीकरण केंद्रांवर नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात टप्प्या टप्प्याने लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आली. सध्या ४३ केंद्रांवरून आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी, वयोवृद्ध, अतिजोखमीच्या गटातील व्यक्ती तसेच पहिल्या फळीतील कोविड योद्धांना काेविडची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. मंगळवार २३ मार्चपर्यंत जिल्ह्यातील ४५ हजार २९३ व्यक्तींना कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लसीचा पहिला तर ११ हजार ७९४ व्यक्तींना लसीचा दुसरा डोज देण्यात आला आल्याचे सांगण्यात आले.
लसीकरण केंद्रांवरून देण्यात येणारी कोविडची प्रतिबंधात्मक लस कोविड मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे लस घेवू इच्छिणाऱ्या लाभार्थ्याने लसीबाबत कुठलीही भीती मनात न बाळगता नजीकच्या लसीकरण केंद्रावर जावून कोविडची प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी.
- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी वर्धा.