शहरातील पंधरा गुन्हेगारांना केले स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST2019-09-12T06:00:00+5:302019-09-12T06:00:21+5:30
शहर पोलिसांनी लागलीच पंधरा गुन्हेगारांना स्थानबद्ध केले. वर्ध्यात कारवाई झाली पण, जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांना अद्यापही कारवाईचा मुहूर्त सापडलेला दिसत नाही. जिल्ह्यात गणेश उत्सव सुरु झाल्यानंतरही अट्टल गुन्हेगार मोकळे फिरत आहे. त्यांच्यापासून या उत्सवाच्या काळात शांतता भंग होण्याची शक्यता होती.

शहरातील पंधरा गुन्हेगारांना केले स्थानबद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे सण-उत्सवाच्या कालावधीत शांतता भंग होण्याची शक्यता असतानाही पोलिसांचे अट्टल गुन्हेगाराकडे लक्ष नव्हते. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच पोलीस प्रशासनाला जाग आली. शहर पोलिसांनी लागलीच पंधरा गुन्हेगारांना स्थानबद्ध केले. वर्ध्यात कारवाई झाली पण, जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांना अद्यापही कारवाईचा मुहूर्त सापडलेला दिसत नाही.
जिल्ह्यात गणेश उत्सव सुरु झाल्यानंतरही अट्टल गुन्हेगार मोकळे फिरत आहे. त्यांच्यापासून या उत्सवाच्या काळात शांतता भंग होण्याची शक्यता होती. याच अनुशंगाने पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता ‘अवैध धंद्यासह गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांचे धाडसत्र केव्हा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले.
त्यानंतर दोन दिवसातच शहर पोलिसांनी धाडसत्र राबवून गणेश विसर्जनासह इतरही सण-उत्सव शांततेत व्हावा म्हणून १५ गुन्हेगारांना स्थानबद्ध तसेच १४ सप्टेंंबरपर्यंत शहरात प्रवेश बंदीचा आदेशही दिला आहे. यामध्ये शहरातील राजेश उर्फ राज्या उर्फ जितेश सुरेश बालवे (३०) रा. देवळी नाका, बालद शिवचरण शाहू (२४) रा. मालगुजारीपुरा, अभय बंसीलाल सोरटे (४०), रा. हवालदारपूरा, दशरथ नारायन मुळे (२८) रा. आर्वीनाका, रामु किसन सातपुते (२८) रा. आर्वीनाका, मनोज हरीचंद्र पाला (४८) व संजय हरीचंद्र पाला (३४) दोघे राहणार कंजर मोहल्ला इतवारा, सचिन बारकु मसराम (३७) रा. इतवारा, रवि गणेशलाल शाहू (४२) रा. महादेवपुरा, पप्पू बाबाराव कांबडे (३०) रा. स्टेशनफैल, निलेश मनोहर बालमांडरे (३५) रा. आनंदनगर, धिरज श्याम गौतम (२३), राकेश मुन्ना पांडे (२८), लियाकत अली निसार अली (३५),व श्रदानंद संतोष कंजरभट (२१) सर्व राहणार इतवारा बाजार, या आरोपींचा समावेश आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी भिमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी व डी.बी.पथकाने केली.