आंबलेले दूध माणसाच्या सर्व आजारांवर लाभदायक
By Admin | Updated: November 1, 2014 23:12 IST2014-11-01T23:12:58+5:302014-11-01T23:12:58+5:30
देशी गाईचे कच्चे व आंबलेले दूध हे मनुष्याच्या आरोग्याचे रक्षण कवच आहे. कच्चे व आमलेले दूध सेवन केल्याने मनुष्य विविध आजारापासून मुक्त राहू शकतो. लॅक्टीक अॅसिडचे प्रमाणही देशी

आंबलेले दूध माणसाच्या सर्व आजारांवर लाभदायक
वर्धा : देशी गाईचे कच्चे व आंबलेले दूध हे मनुष्याच्या आरोग्याचे रक्षण कवच आहे. कच्चे व आमलेले दूध सेवन केल्याने मनुष्य विविध आजारापासून मुक्त राहू शकतो. लॅक्टीक अॅसिडचे प्रमाणही देशी गायीच्या दुधात मोठ्या प्रमाणात असल्याने माणसाच्या संपूर्ण आरोग्यास लाभदायक आहे, असे प्रतिपादन पुणे येथील मेडिकल कॉलेज व प्रिव्हेंटीव्ह सोशल मेडिसीनचे विशेषज्ज्ञ प्रा.डॉ. अशोक काळे यांनी केले़
जय महाकाली शिक्षण संस्था व अखिल भारतीय कृषी गो-सेवा संघ गोपूरी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी अग्निहोत्री कॉलेजच्या पेंटागॉन सभागृहात गोपाष्टमी महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते़ गोमातेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला़ डॉ. अशोक काळे यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझंटेशनद्वारे वैज्ञानिक माहिती देताना भारतीय मूळ वंशाच्या आणि विदेशी वंशाच्या जातीच्या गायींच्या दुधातील संशोधात्मक बाबी स्पष्ट केल्या. यात ‘ए वन’ ही विदेशी वंशाची गाय व ‘ए टू’ ही देशी गाय. संधोधनाच्या आधारे देशी गायीच्या दुधातच मोठ्या प्रमाणात माणसाच्या आरोग्यास लाभादायक तत्वाचे प्रमाण असल्याचे दिसून आले. मधुमेह, रक्तदाब सारख्या आजारासाठी देशी गायीचे कच्चे दूध वा आमले दूध दैनंदिन सेवन केल्याने फायदेशीर ठरतात, असे ते म्हणाले. कोलेस्टेरॉलच्या भीतीमुळे दूध पिण्याचे प्रमाण कमी झाल्याने डेयरी विभागात दुधाची पावडर पडून आहे. दुधाच्या पावडरला जगात किंमत मिळत नाही; पण अॅलोपॅथी संशोधनातून देशी गाईचे कच्चे दूध व आंबले दूध हे आरोग्यासाठी लाभदायक आहे, हे सिद्ध केले आहे़ माणसाचे जीवन सुदृढ ठेवण्यासाठी गायींना जिवंत ठेवले पाहिजे, असे आवाहनही डॉ. काळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरप्रसाद अग्निहोत्री तर अतिथी म्हणून नंदू गावंडे, दिलीप बजाज आदी उपस्थित होते. अग्निहोत्री यांनी आमची भूमी ही ऋषी-मुनींची आहे़ त्या काळापासून गाईंना पवित्र मानले जाते. भारतीय संस्कृतीत पाच प्रकारच्या कामधेनू होत्या. त्यात नंदा गाय ही जमदग्नी ऋषीजवळ होती. जी अहंकार नष्टचे प्रतिक आहे. भारद्वाज मुनीजवळ सुभद्रा कामधेनू होती जी खगोलशास्त्राची प्रतीक होती. वशिष्ठ ऋषीजवळ सुरभी कामधेनू होती. ती शक्तीची प्रतीक होती. बहुनी कामधेनू ही गौतम ऋषीजवळ होती. ती ज्ञानाचे, धर्मशास्त्राचे प्रतीक मानली गेली आहे. सुशीला कामधेनू ही असितमूनी जवळ होती. ती भविष्य व अर्थाचे प्रतीक मानली जाते, असे सांगितले़ गावंडे यांनीही मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक गो-सेवा संघाचे मंत्री मुलचंद बडजाते यांनी केले. गोसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन डॉ. श्रीकांत घरोटे यांनी केले तर आभार मनोहर पंचारिया यांनी मानले. यावेळी आशिष गोस्वामी, प्राचार्य धर्मेंद्र मुंधडा, प्रमोद गिरडकर, अरुण वसू, संजीव लाभे, गजेंद्र सुरकार आदी उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)