भाजपाच्या नवनिर्वाचितांचा सत्कार
By Admin | Updated: March 13, 2017 00:49 IST2017-03-13T00:49:01+5:302017-03-13T00:49:01+5:30
भारतीय जनता पक्षाच्यावतीने न.प.,जि.प. व पं.स. निवडणुकीत ऐतिहासिक विजय संपादीत केल्याबद्दल वर्धा

भाजपाच्या नवनिर्वाचितांचा सत्कार
वर्धा व अमरावतीतील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती
वर्धा : भारतीय जनता पक्षाच्यावतीने न.प.,जि.प. व पं.स. निवडणुकीत ऐतिहासिक विजय संपादीत केल्याबद्दल वर्धा लोकसभा मतदार संघातील भाजपच्या कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांचा स्रेहमिलन सोहळा घेण्यात आला. हा कार्यक्रम खासदार रामदास तडस यांनी आयोजित केला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे विदर्भ प्रदेश संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे प्रदेश महासचिव डॉ. रामदास आंबटकर, आ. समीर कुणावार, आ. डॉ. पंकज भोयर, जि. प. अध्यक्ष चित्रा रणनवरे, माजी खासदार विजय मुडे, सुरेश वाघमारे, माजी आमदार अरुण अडसड, दादाराव केचे, भाजपाचे वर्धा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, अमरावतीचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, सुधीर दिवे, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष अर्चना वानखेडे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे आदींची उपस्थिती होती.
डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी वर्धा व अमरावती जिल्ह्यातून आलेल्या सर्व कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, जि. प. सदस्य व पं.स. सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नागपूर येथील चमुने गीररंजन हा गाण्याचा कार्यक्रम सादर केला. प्रास्ताविक खा. तडस यांनी केले. संचालन दीपक फुलकरी यांनी केले तर आभार भाजपाचे जिल्हा सरचिटणीस किशोर दीघे यांनी केले. कार्यक्रमाला वर्धा व अमरावती जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)