शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

रेहकीच्या शेतकऱ्यांची मदतीसाठी फरफट

By admin | Updated: February 7, 2015 23:28 IST

यावर्षी शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला. शासनाने दुष्काग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक ‘पॅकेजची’ घोषणा केली. याचा लाभ मिळण्याकरिता महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या.

सेलू : यावर्षी शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला. शासनाने दुष्काग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक ‘पॅकेजची’ घोषणा केली. याचा लाभ मिळण्याकरिता महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आर्थिक मदत पोहचविण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या तातडीच्या सुचना असल्याने गती आली; मात्र रेहकी या गावातील तलाठ्याच्या दुर्लक्षितपणामुळे तेथील शेतकऱ्यांपैकी एकाचेही नाव मदतीच्या यादीत नसल्याने मोठा घोळ झाला. याचा फटका तेथील शेतकऱ्यांना बसत आहे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करताना तलाठ्यावर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली. यावेळी त्याला निलंबित करण्यात आले. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल तसाच पडून राहिला. दुसऱ्या तलाठ्याकडे पदभार देण्यास २२ दिवसांचा कालावधी लागला. तलाठी एस. आर. चेन्नुरवार यांनी पदभार स्वीकारला; मात्र त्यांनी शेतकऱ्यांना मिळाणाऱ्या मदतीकरिता आवश्यक असलेल्या याद्यांकडे दुर्लक्ष केले. याच काळात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतनिधी देण्याचे काम जोरात सुरू झाले. रेहकी येथील शेतकऱ्यांच्या याद्या विहित मुदतीत पोहचल्या नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झाली नाही. या सर्व प्रक्रीयेची जराही कल्पना नसल्याने शेतकरी आपली मदत बँकखात्यावर जमा झाली, असे समजून बँकेच्या चकरा मारू लागला. मात्र चौकशी अंती घडलेला प्रकार कळल्यावर आपण मदतीपासून आता मुकणार, अशी शेतकऱ्यांची धारणा झाली. नवीन तलाठ्याला शेतकरी स्वत: जावून भेटले असता शसनाकडे रक्कम शिल्लक राहिली तर तुम्हाला मिळेल अन्यथा काही खरे नाही, असे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. आता आपण या मदतीपासून वंचित तर होणार नाही ना? अशी भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.(तालुका प्रतिनिधी)तयार केलेल्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयात पडून येथील ग्रामपंचायतीद्वारे दवंडी देवून शेतकऱ्यांचे खाते क्रमांक मागवून घेतले होते. ते दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या तयार केलेल्या यादीवर टाकण्यात आले. हे कार्य सुरू असतानाच येथील तलाठी लाचलुचपत विभगाच्या जाळ्यात अडकला. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या काळात या याद्यांकडे दुर्लक्ष झाले. त्या याद्याचा गठ्ठा ग्रामपंचायतीत तसाच पडून राहिल्याने या शेतकऱ्यांना मदत मिळेल अथवा नाही याची भीती वाटू लागली आहे. नवीन पटवाऱ्याने त्या याद्या गोळा करून लवकरात लवकर बँकेत जमा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी गावात जोर धरत आहे.