पालिकेच्या आरोग्य विभागातील मुख्य पर्यवेक्षकाचे ‘एफबी’ अकाऊंट हॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST2020-05-20T05:00:00+5:302020-05-20T05:00:27+5:30
ठाकूर यांचे हॅक केलेले फेसबुक अकाऊंटचा वापर करून अनेकांशी आरोपीने चाटींग केली. या चाटींग दरम्यान हॅकरने महत्त्वाच्या कामासाठी पैशाची मागणी करीत एक बँक खाते क्रमांक देत ऑनलाईन पद्धतीने यात पैसे टाकण्याचे सूचविले. हॅकरच्या याच खोट्या बतावणीला चैतन्य गावंडे हा बळी पडला. त्याने हॅकरच्या म्हणण्यावर विश्वास ठेऊन १५ हजाराची रक्कम ऑनलाईन पद्धीने हॅकरने दिलेल्या बँक खात्यात वळती केल्याचे अशोक ठाकूर यांनी सांगितले.

पालिकेच्या आरोग्य विभागातील मुख्य पर्यवेक्षकाचे ‘एफबी’ अकाऊंट हॅक
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा न.प. आरोग्य विभागातील मुख्य पर्यवेक्षक अशोक ठाकूर यांचे फेसबुक अकाऊंट अज्ञाताने हॅक केले. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने ठाकूर यांच्या फ्रेन्ड लिस्ट मध्ये असलेल्या व्यक्तींशी चाटींग करून अतिशय महत्त्वाचे काम असल्याचे सांगत अनेकांना पैशाची मागणी केली. हॅकरच्या या खोट्या बतावणीला ठाकूर यांचे निकटवर्तीय चैतन्य गावंडे बळी पडले असून त्यांची १५ हजाराने फसवणूक करण्यात आली आहे.
ठाकूर यांचे हॅक केलेले फेसबुक अकाऊंटचा वापर करून अनेकांशी आरोपीने चाटींग केली. या चाटींग दरम्यान हॅकरने महत्त्वाच्या कामासाठी पैशाची मागणी करीत एक बँक खाते क्रमांक देत ऑनलाईन पद्धतीने यात पैसे टाकण्याचे सूचविले. हॅकरच्या याच खोट्या बतावणीला चैतन्य गावंडे हा बळी पडला. त्याने हॅकरच्या म्हणण्यावर विश्वास ठेऊन १५ हजाराची रक्कम ऑनलाईन पद्धीने हॅकरने दिलेल्या बँक खात्यात वळती केल्याचे अशोक ठाकूर यांनी सांगितले. मध्यरात्रीपासून अनेकांचे फोन आल्यानंतर आपले फ्रेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे लक्षात येताच अशोक ठाकूर यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. त्यानंतर सायबर सेल मधील तज्ज्ञांनी हॅक झालेल्या फ्रेसबुक अकाऊंटचा युजर व पासवर्ड क्रमांक बदलून दिला. शिवाय सदर प्रकार नेमका काय याची चौकशी सुरू केली आहे.
हॅकरने केला दिग्गजांशी संवाद
अशोक ठाकूर यांच्या फेसबुक वरील फ्रेड लिस्टमध्ये असलेल्या माजी नगराध्यक्ष निरज गुजर, कंत्राटदार बाबा जाकीर, भाजप शहर प्रमुखाचे पुत्र अंकीत परियाल, किराणा व्यावसायीक मिलिंद गांधी, माजी नगरसेविकेचे पुत्र अमित जैन, शिवाय एक पत्रकार या वर्धा शहरातील दिग्गजांसह ठाकूर यांच्या निकटवर्तीयांशी फेसबुक चाटींगद्वारे संवाद साधून पैशाची मागणी केली.
वर्धा न.प. आरोग्य विभागातील मुख्य पर्यवेक्षक अशोक ठाकूर यांचे फेसबुक अकाऊंट अज्ञाताने हॅक करून त्यांच्या फ्रेड लिस्टमधील व्यक्तींना पैशाची मागणी केल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाली आहे. सदर प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. शिवाय त्यांच्या फेसबुकचा युजर व पासवर्ड बदलून देण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात येईल.
- नीलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक, सायबर सेल, वर्धा.