शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मुलाकडून वडिलांची गळा आवळून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:01 IST

चोरडिया ले-आऊट परिसरातील मृत सुरेश डकरे (५५) त्यांची पत्नी सुनिता मुलगा आकाश हे नामदेव वानखेडे यांच्या घरी किरायाच्या घरात राहत होते. मृत सुरेश डखरे यांना दारूचे व्यसन असल्याने नेहमीच त्यांच्या घरात वाद होत होता. मिस्त्री काम करून ते आपल्या कुटुंबाचा गाडा चालवित असे.

ठळक मुद्देआरोपीस तीन दिवस पोलीस कोठडी : आर्वी शहरात एकच खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : घरगुती वादातून मुलाने वडिलांची गळा आवळून हत्या केली. स्टेशन वॉर्ड परिसरातील चोरडिया लेआऊट येथे रविवारी रात्री ही घटना घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. आरोपी मुलाला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.चोरडिया ले-आऊट परिसरातील मृत सुरेश डकरे (५५) त्यांची पत्नी सुनिता मुलगा आकाश हे नामदेव वानखेडे यांच्या घरी किरायाच्या घरात राहत होते. मृत सुरेश डखरे यांना दारूचे व्यसन असल्याने नेहमीच त्यांच्या घरात वाद होत होता. मिस्त्री काम करून ते आपल्या कुटुंबाचा गाडा चालवित असे. रविवारी रात्रीच्या सुमारास सुरेश डकरे दररोजप्रमाणे मद्य प्राशन करून घरी आले आणि पत्नीला जेवायला वाढण्यास सांगितले. जेवण देण्यास उशिर झाल्याने सुरेश डखरे याने ताट फेकून दिले. दोघांमध्ये वाद झाला. सुरेश डकरे हे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करुन मारहाण करू लागले.ही बाब मुलगा आकाश डकरे (२४) याच्या निदर्शनास येताच त्याने वडिलांना हटकून आईला शिवीगाळ का करीत आहे असे म्हटले. बापलेकात चांगलाच वाद झाला. दरम्यान मुलगा आकाश याने वडिल सुरेश डखरे यांना धक्का दिला असता ते गल्लीत पडले. गल्लीत असलेलया पाण्याच्या माठाची लोखंडी आडणी त्यांच्या डोक्याला लागल्याने डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. दरम्यान आकाश डखरे हा वडिलांच्या छातीवर बसला आणि माठाला लावून असलेल्या टॉवेलने वडिल सुरेश डकरे यांचा गळा आवळून त्यांची हत्या केली.ही बाब पत्नी सुनिता डकरे यांच्या लक्षात येताच त्यांनी मुलाला सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार देत मुलगा आकाश याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आकाश डकरे याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ ढोले, अखिलेश गव्हाणे, रविंद्र खरे, राहुल देशमुख, प्रकाश सानप करीत आहे.

टॅग्स :Murderखून