शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून मुलाकडून वडिलांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 05:00 IST

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रवींद्र बाबरे हे मद्य प्राशन करून घरी आले आणि शेतात पेरणी केलेले तुरीचे बियाणे का निघाले नाही, असे म्हणून पत्नीला मारहाण करू लागले. दरम्यान मुलगा पीयूष बाबरे हा आईला वाचविण्यासाठी मध्यस्थी गेला असता रवींद्रने त्यालाही मारहाण केली. दोघांमध्ये चांगलाच वाढ उफाळला. रागाच्या भारात पीयूषने रवींद्रवर धारदार शस्त्राने वार करीत त्यांची हत्या केली.

ठळक मुद्देआरोपी जेरबंद, गुन्ह्यात धारदार शस्त्राचा केला वापर, परिसरात एकच खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.): कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत मुलाने वडिलांच्या शरीरावर धारदार शस्त्रााने वार करीत त्यांचा खून केला. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास बेलोरा (जळगाव) येथे ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी मुलाला तळेगाव पोलिसांनी अटक केली असून मृतदेह आर्वी येथे उत्तरिय तपासणीसाठी पाठविण्यात आला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.रवींद्र साहेबराव बाबरे (५२) असे मृताचे नाव असून आरोपी मुलगा पीयूष बाबरे (२०) यास अटक करण्यात आली आहे.पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, बेलोरा येथील रविंद्र बाबरे हे पत्नी व दोन मुलांसह राहायचे. त्यांचा शिवणकाम करण्याचा व्यवसाय होता. रविंद्रला दारूचे व्यसन होते. त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. रवींद्र हे दररोज मद्य प्राशन करून घरात वाद घालीत असे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रवींद्र बाबरे हे मद्य प्राशन करून घरी आले आणि शेतात पेरणी केलेले तुरीचे बियाणे का निघाले नाही, असे म्हणून पत्नीला मारहाण करू लागले. दरम्यान मुलगा पीयूष बाबरे हा आईला वाचविण्यासाठी मध्यस्थी गेला असता रवींद्रने त्यालाही मारहाण केली. दोघांमध्ये चांगलाच वाढ उफाळला. रागाच्या भारात पीयूषने रवींद्रवर धारदार शस्त्राने वार करीत त्यांची हत्या केली. याची माहिती तळेगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करून मृत रविंद्र बाबरे यांचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी आर्वी येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविला. पोलिसांनी याप्रकरणी मुलगा पियूष बाबरे यास रात्रीच अटक केली. पुढील तपास ठाणेदार रविकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक धीरज राजुरकर, आशिष नेवारे, रूपेश उगेमुगे, अनिल ढाकणे, मनोज आसोले करीत आहेत.मृत वर्षभरापूर्वीच आला कारागृहाबाहेरमृतक रविंद्र बाबरे याने २००७ मध्ये कौटुंबिक वादातून आईचा खून केला होता. याप्रकरणी मृत रवींद्र हा तब्बल ११ वर्षे कारागृहात शिक्षा भोगत होता. वर्षभरापूर्वीच रवींद्र कारागृहातून बाहेर पडत गावात आला होता. त्यानंतर त्याला दारूचे व्यसन जडले होते. मद्यधुंद अवस्थेत तो नेहमीच कुटुंबीयांशी वाद घालत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Murderखून