शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची पायपीट सुरूच

By admin | Updated: February 4, 2015 23:20 IST

नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या हवामान आधारित पीक विम्यासाठी अद्यापही पायपीट करावी लागत आहे. धामणगाव (वाठोडा) येथील शेतकरी

वर्धा : नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या हवामान आधारित पीक विम्यासाठी अद्यापही पायपीट करावी लागत आहे. धामणगाव (वाठोडा) येथील शेतकरी प्रवीण ठाकरे हे वर्षभरापासून धडपत आहे. मात्र संबंधित विभागाकडून याबाबत अनास्था दाखविली जात आहे. जिल्ह्यात हवामानावर आधारित पीक विमा योजना गेल्या वर्षीच्या हंगामापासून सुरू झाली. गेल्या वर्षीचे नैसर्गिक संकट व पुन्हा या वर्षीच्या हंगामातील भर लक्षात घेता अनेक शेतकरी विम्याचा लाभ मिळावा, या अपेक्षेत आहे. परंतु प्रशासनातील तकलादू भूमिकेमुळे बहुतांश शेतकऱ्यांची पायपीट सुरूच आहे. धामणगाव (वाठोडा) येथील शेतकरी प्रवीण ठाकरे यांच्याकडे चार खातेदार मिळून वायफड शिवारात २१ एकर जमीन आहे. त्यांनी गेल्या वर्षीच्या हंगामात कापसाची पेरणी केली. त्यावेळी संपूर्ण कापूस पिकाचा विमा उतरविला. हप्त्याची १३ हजार ५०० रूपये रक्कम संबंधितांकडे भरून पावतीसुध्दा मिळविली. परंतु नैसर्गिक संकटामुळे पिकांची वाट लागली. यामुळे हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळावी, यासाठी त्यांनी संबंधितांकडे अर्ज दाखल केला. परंतु त्यांना अद्यापही न्याय देण्यात आला नाही. त्यांनी न्यायालयातसुध्दा विम्याच्या रकमेसाठी दाद मागितली. न्यायालयाने पीक विम्याचा २ लाख रूपयांचा दावा मंजूर केला. परंतु त्यातील पूर्णत: रक्कम देण्यात आली नाही. यासाठी त्यांची अद्यापही पायपीट सुरू आहे. न्याय न मिळाल्याने सदर शेतकऱ्याने लोकशाही दिनात अर्ज दाखल केला होता. शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी विविध योजना दिल्या जातात. परंतु त्याची प्रत्यक्षरीत्या अंमलबजावणी केली जात नाही. हवामान आधारित पीक विमा योजना हे याचेच एक मूर्तीमंत उदाहरण आहे. अद्यापही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा उतरवूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभिर्याने दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)