वन्यप्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त
By Admin | Updated: January 28, 2015 23:39 IST2015-01-28T23:39:34+5:302015-01-28T23:39:34+5:30
मानवाप्रमाणे इतर पशुपक्ष्यांना जीवन जगण्याचा अधिकार असून त्यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण कायदा अंमलात आणला आहे. त्यामुळे जंगलातील प्रत्येक प्राण्याला कायद्याचे संरक्षण मिळाले अहे.

वन्यप्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त
उपाययोजना करण्याबाबत वन विभाग उदासीन
नारायणपूर : मानवाप्रमाणे इतर पशुपक्ष्यांना जीवन जगण्याचा अधिकार असून त्यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण कायदा अंमलात आणला आहे. त्यामुळे जंगलातील प्रत्येक प्राण्याला कायद्याचे संरक्षण मिळाले अहे. परंतु हा कायदा आता शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याने चित्र नारायणपूर परिसरात पहावयास मिलत आहे.
वन्य प्राण्यामुळे सध्या नारायणपूर परिसरातील शेतकरी असुरक्षित झाले आहे. स्वत:चे शेतातील पिकाचे संरक्षण करणेही अवघड झाले आहे. पेरणीपासून तर पीक हातात येईपर्यंत ग्रामीण भागातील शेतकरी पिकाचे लेकरासारखे पालन पोषण करतो. त्यासाठी हजारो रुपये खर्च येतो. पण पीक एक उत्पादनावर आल्यावर वन्यप्राण्यांचा उप्रदव सुरू होत असून त्याला रोखण्यात शेतकरी असमर्थ ठरत आहे.
रानडुक्कर, रोही, माकड, नीलगाय आदी वन्यप्राण्यांचा नारायणपूर परिसरात मुक्तसंचार पाहावयास मिळतो. सुरुवातीला हे प्राणी फटाक्याच्या आवाजाने घाबरून पळून जायचे. पण आता हा आवाज त्यांच्या परिचयाचा झाला आहे. मौजा गणेशपूर येथे वन विभागाने १५ वर्षापूर्वी नर्सरी तयार केली. आज त्याचे रुपांतर जंगलात झाले असल्याने वन्य प्राण्याचा हैदोस वाढला आहे. जंगल शेजारची शेकडो हेक्टर शेती पडिक होण्याच्या स्थितीत आहे. या जंगली प्राण्यापासून शेतातील पीके तर सोडा, स्वत:चा जीव वाचविणे सुद्धा कठीण झाले आहे.
वन्यप्राणी शेतीचे नुकसान करीत आहे तर दुसरीकडे जंगलात दबा धरून बसलेले हिंस्र प्राणी दुधाळ जनावरे फस्त करीत आहे. वन्यजीव संरक्षण कायदा असल्यामुळे शेतकरी मात्र काही करू शकत माही. मदतीसाठी केवळ वनाधिकाऱ्याची मनधरणी करनेच त्यांच्या हाती आहे.
वन्यप्राण्यांना कायद्याने संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी वन्य प्राण्यांना मारू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे रक्षण व्हावे, शेतशिवारात सदर प्राणी भटकू नये यासाठी उपाययोजना आखणे अत्यावश्यक आहे. तसेच जंगलाच्या अगदी शेजारीच असलेल्या शेताना वनविभागाने तारेचे कुंपण १०० टक्के अनुदानावर देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
परंतु वन विभाग देत असलेल्या तुटपूंज्या मदतीसाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या घातक कायद्यात बदल करून शेतकऱ्यानाही संरक्षण देण्यात यावे, अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. तसेच वन्य प्राण्यांपासून पिकांचे आणि वन्य प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)