शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांजवळ फार्मर आयडी असणे आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 17:51 IST

आयडी केला अनिवार्य : शेतीचे व्यवहार करतानाही येणार अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : केंद्र सरकारच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अॅग्रीकल्चर अंतर्गत देशात 'अॅग्रीस्टॅक' प्रकल्प राबवायला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पांतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचे 'फार्मर आयडी' तयार केले जात आहेत. या 'आयडी' मध्ये शेतीसह शेतकऱ्यांची मूलभूत माहिती समाविष्ट केली जात आहे.

या 'आयडी' शिवाय सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळणार नसून, शेतीविषयक व्यवहार करता येणार नाहीत. फार्मर आयडी (शेतकऱ्यांचा विशेष ओळख क्रमांक) हा या प्रकल्पाचा मूळ गाभा तर शेतजमिनीचे जिओ रेफरन्सिंग (भू-संदर्भीकरण) हा उद्देश आहे. यात शेतकऱ्यांना सातबाराला त्यांचा आधार क्रमांक लिंक करायचा आहे. सातबारावर एकापेक्षा अधिक नावे असल्यास त्या सर्वांचे आधार क्रमांक लिंक करणे अनिवार्य आहे. आधार क्रमांकाला लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी येत असल्याने तसेच तो ओटीपी फीड करावा लागत असल्याने ही प्रक्रिया करताना मोबाइल क्रमांक सोबत असणे आवश्यक आहे. ही अवघ्या १५ ते २० मिनिटांची संपूर्ण प्रक्रिया महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना पूर्ण करून देणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. भविष्यात हा युनिक आयडी महत्त्वाचा ठरणार आहे. 

पॅनचा डेटाही मिळणारफार्मर युनिक आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा वा सुविधेचा लाभ डिजिटल पद्धतीने घेता येणार आहे.एकप्रकारे कागदपत्रांच्या कटकटीतून मुक्तता होणार आहे. सोबतच बँक खाते, आधार, पॅनचा डेटाही या माध्यमातून उपलब्ध होईल.

प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार युनिक आयडीडिजिटल कृषी मिशनअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेतजमीन आहे, अशा प्रत्येक शेतकऱ्यास युनिक आयडी देण्यात येणार आहे. याद्वारे सुविधांचा लाभ घेणे सोपे होईल. जसे की, बँक, आधार आदी.

डिजिटल पद्धतीने करता येतील कामे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना हाती घेण्यात आली आहे. या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती संबंधित सर्व कामे डिजिटल पद्धतीने करता येतील.

फार्मर आयडी यासाठी ठरणार महत्त्वाचा... पीएम किसान योजनेचे अनुदान मिळविणे, पीककर्ज, किसान क्रेडिट कार्ड व अॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड व इतर शेतीवि- षयक कर्ज मिळविणे, पीक विमा काढणे व नुकसान झाल्यास परतावा मिळविणे, सरकारने जाहीर केलेल्या पिकांच्या नुकसान भरपाईचा लाभ मिळविणे, पिके व शेतीविषयक सर्वेक्षण करणे आदी सर्वच प्रकारच्या योजनांसाठी लाभदायक ठरेल.

टॅग्स :FarmerशेतकरीfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रwardha-acवर्धा