राष्ट्रीयकृत बँकांमध्ये शेतकऱ्यांची थट्टा

By Admin | Updated: May 14, 2014 02:12 IST2014-05-13T23:51:55+5:302014-05-14T02:12:20+5:30

कृषी विकास कार्याकरिता राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांची अधिकारी व कर्मचारी थट्टा करीत असल्याचा आरोप होत आहे.

Farmers joke in nationalized banks | राष्ट्रीयकृत बँकांमध्ये शेतकऱ्यांची थट्टा

राष्ट्रीयकृत बँकांमध्ये शेतकऱ्यांची थट्टा

समुद्रपूर : कृषी विकास कार्याकरिता राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कर्ज मागणार्‍या शेतकर्‍यांची अधिकारी व कर्मचारी थट्टा करीत असल्याचा आरोप होत आहे. याबाबतची रितसर तक्रारही करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवीन सोना यांना केलेल्या तक्रारीतून शेतकरी संघटनेचे प्रवीण महाजन यांनी कारवाईची मागणी केली आहे.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या तक्रारीत कोरा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत चिखली येथील शेतकरी संतोष सदाशिव शेंडे, रामभाऊ मारोती शेंडे, किशोर नामदेव बहादुरे, उमरी येथील झोलबा उपरे हे सर्व शेतकरी फेब्रुवारी महिन्यापासून विहिरीचे बांधकाम, मोटारपंप खरेदी व वीज पुरवठय़ासाठी कर्जाची मागणी करीत आहेत. शेतकर्‍यांना तेथील बँक व्यवस्थापक खेडकर यांनी असभ्य शब्दात सुणावले. आता कर्ज देण्याची वेळ नाही, पीक कर्जाशिवाय इतर दुसरे कर्ज देत नाही, अशा शब्दात खडसावून कर्ज देईल वा देणार नाही, असा इशारा दिला. एवढय़ावरच शाखा व्यवस्थापक थांबले नाहीत तर तुमच्याकडून जे होते ते करून घ्या, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत. महाराष्ट्र बँकेतून कर्ज मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी बँक ऑफ इंडियामध्ये कर्जाची मागणी केली. तेथेही शेतकर्‍यांना कर्ज देण्यास नकारच दिला जात आहे. यामुळे शेतकर्‍यांची कर्जासाठी भटकंतीच सुरू आहे.

बँक ऑफ इंडियामध्ये कर्ज मागावला गेल्यानंतर आमच्याकडे कर्मचारी नाही, असे कारण पूढे करण्यात आले. विशेष म्हणजे कोणत्याही बँकेत दलालामार्फत कर्ज मागणीचा अर्ज शेतकर्‍याने केला तर तो मंजूर करण्यात येतो. येरणगाव येथील शेतकरी परमेश्‍वर शिवराम नगराळे यांनी हिंगणघाट येथील भारतीय स्टेट बँकेत सुक्ष्म सिंचन साहित्य खरेदीकरिता कर्जाची मागणी केली. यात शेतकर्‍याची जमीन पावणे तीन एकर असल्याने तो शेतकरी अल्प भूधारक ठरला. हेच कारण पूढे करून नगराळे यांना कर्ज देण्यास नकार देण्यात आला. असे अनेक प्रकार आहेत. राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी शेतकर्‍यांना कर्ज देण्यात उदासीन दिसतात. या अधिकार्‍यांवार त्वरित कारवाई करावी व शेतकर्‍यांची थट्टा बंद करावी, अशी मागणीही प्रवीण महाजन यांच्यासह शेतकर्‍यांनी तक्रारीतून केली.(शहर प्रतिनिधी)

 

Web Title: Farmers joke in nationalized banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.