वाघाच्या दहशतीने शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:04 IST2018-10-14T00:01:41+5:302018-10-14T00:04:39+5:30
या परिसरातील शेतकरी शेतमजूर व गोपालकांच्या अडचणीत वाघाच्या दहशतीमुळे भर पडली आहे. आजनडोह, कन्नमवारग्राम, हेटी, बांगडापूर, हेटी, कुर्डा, धानोली, येनीदोडका, भेट, उमविहरी हा परिसर जंगल व्याप्त असून येथील नागरिकांमध्ये वाघाची भीती निर्माण झाली आहे.

वाघाच्या दहशतीने शेतकरी हवालदिल
लोकमत न्यूज नेटवर्क
कन्नमवारग्राम : या परिसरातील शेतकरी शेतमजूर व गोपालकांच्या अडचणीत वाघाच्या दहशतीमुळे भर पडली आहे. आजनडोह, कन्नमवारग्राम, हेटी, बांगडापूर, हेटी, कुर्डा, धानोली, येनीदोडका, भेट, उमविहरी हा परिसर जंगल व्याप्त असून येथील नागरिकांमध्ये वाघाची भीती निर्माण झाली आहे.
हेटीकुंडी येथे वाघाने गाईवर हल्ला करून तिला जखमी केले. तर दहा दिवसांपूर्वी साठे यांच्या मालकीची गाय वाघाने ठार केल्याने पशुपालकांच्या अडचणीत भर पडली आहे. उमविहिरी येथील रस्त्यावर दिवसाच ठिय्या मांडणाऱ्या वाघाचे दर्शन ये-जा करणाऱ्यांना होत असल्याचे या भागातील नागरिक सांगतात. या भागात व्याघ्र दर्शन होत असल्याने शेतकरी व शेतमजुरही शेतात जाण्यास नकार देतात. शिवाय रात्रीच्या शेतात पिकाच्या संरक्षणासाठी जाणाºया शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घेवूनच रात्र काढावी लागत आहे.
वाघाच्या दहशतीमुळे या भागातील शेतीची कामे ठप्प पडली असून या भागातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची आहे.