पांदण रस्त्यांमुळे शेतकऱ्यांची वहिवाट सुखद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:12 IST2018-03-08T00:12:00+5:302018-03-08T00:12:00+5:30
शेतकऱ्यांना वहिवाटीकरिता पांदण रस्त्यांची मोठी अडचण आहे. हीच अडचण लक्षात घेता सेलू तालुक्यातील पांदण रस्ते मोकळे करण्यासाठी.....

पांदण रस्त्यांमुळे शेतकऱ्यांची वहिवाट सुखद
ऑनलाईन लोकमत
वर्धा : शेतकऱ्यांना वहिवाटीकरिता पांदण रस्त्यांची मोठी अडचण आहे. हीच अडचण लक्षात घेता सेलू तालुक्यातील पांदण रस्ते मोकळे करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे यांनी पाठपुरावा सुरू केला. आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नाने नुकताच येळाकेळी सर्कलमध्ये पांदण रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. काही दिवसात परिसरातील १७ पांदण रस्ते मोकळे होणार असल्याने शेतकऱ्यांची वहिवाट सुखद होणार आहे.
सेलू तालुक्यातील येळाकेळी संर्कलमध्ये पांदण रस्त्याअभावी शेतकऱ्यांना शेतात जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत. अनेकदा तर शेतात जाताना अपघात होतात. शेतमाल घरापर्यंत घेऊन जआणे अडचणीचे ठरते. शेतकऱ्यांच्या मागणीकडे भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक कलोडे तसेच जिल्हा परिषद सभापती सोनाली कलोडे यांनी लक्ष देत आमदार डॉ. पंकज भोयर यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. यामुळे सामुहिक योजनेअंतर्गत सभापती कलोडे यांच्या निधीतून रेहकी, सुरगाव, येळाकेळी व म्हसाळा, आकोली येथील ६ कि़मी. पांदण रस्त्याचे आमदार भोयर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
येत्या काही दिवसात पालकमंत्री पांदण रस्ते योजनेतून सर्कलमधील १७ पांदण रस्त्यांचे काम करण्यात येणार असल्याची माहिती अशोक कलोडे यांनी दिली. सर्कलमधील भूमिपूजन सोहळ्याला पंचायत समिती सभापती जयश्री खोडे, सदस्य बंडू गव्हाळे, सुधाकर सावरकर, अरूण घोंगडे, विनायक धानकुटे, फुलचंद शिंदे, पे्रम झाडे, प्रशांत लांडे, किरण मुजबैले, आशिष झाडे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष विलास वरटकर, सुरगावचे विजय पंदरे, निोद येंगडे, दामोधर सहाकाटे, बबलू मोहता, आदी शेतकरी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.