शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

शेतकऱ्यांना मदत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 22:03 IST

अतिवृष्टीमुळे हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यात शेतकऱ्यांचे पिके वाहून गेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला अहवाल सादर करण्यात आला. मात्र, अजूनही राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केलेली नाही,....

ठळक मुद्देविरोधी पक्ष नेत्यांचे वेधले लक्ष : राजू तिमांडे यांची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : अतिवृष्टीमुळे हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यात शेतकऱ्यांचे पिके वाहून गेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला अहवाल सादर करण्यात आला. मात्र, अजूनही राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केलेली नाही, अशी तक्रार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे माजी आमदार राजू तिमांडे यांनी केली. नागपूर येथे मुंडे यांची भेट घेवून त्यांनी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दयनिय अवस्था विषद केली.माजी आमदार राजू तिमांडे म्हणाले की ५ जुलैपासुन सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्याच्या शेतातील उभी पीके करपल्या गेली आहे. शेतकऱ्यांना तिबार पेरणीचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट समुद्रपूर, सेलू तालुक्यात पावसाने सलग २५ तास जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खुप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली.अतिवृष्टीमुळे नांद धरणाचे ६ दरवाजे, वडगाव धरणाचे १३ दरवाजे उघडण्यात आले होते. पाण्याचा विसर्ग झाल्याने नदी व नाल्याकाठच्या शेतजमिनीतील उभी पीके ४८ तासाच्यावर पाण्यात होती. त्यामुळे शेतजमिनीतील उभी पीके खरवडून गेली.काही गावामध्ये पाणी घुसल्यामुळे घरे पडलेत.एकुण ४५७७.२ हेक्टरचे ३३ टक्याच्या आत तर ५७६५.२२ हेक्टरचे ३३ टक्याच्या वर नुकसान झाले आहे. समुद्रपूर तालुक्यातील १६८ गावांना पुराचा फटका बसला असून घरांची पडझड झाली आहे. आणि पुरामध्ये जनावरे सुद्धा मृत्युमुखी पडलेली आहे. तरी झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या पिकांची परिस्थिती लक्षात घेता सरकार कडून सर्वे करुन आर्थिक मदत देण्यात येईल, अशी अपेक्षा होती. वर्धा जिल्हा प्रशासनाने शासनाला याबाबतचा अहवाल पाठविला. परंतु, १० दिवसाचा कालावधी लोटूनही याबाबत शासनाने आर्थिक मदत जाहीर केली नाही. याकडे तिमांडे यांनी ना. धनंजय मुंडे यांचे लक्ष वेधले.विधान परिषदेत मुद्दा मांडणारअनेक शेतकऱ्यांना बोंडअळीचे पैसे मिळाले नाही. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत हिंगणघाट मतदार संघात झालेल्या नुकसानी बाबत आपण विधान परिषदेत सरकारचे लक्ष वेधणार आहोत, असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राजू तिमांडे यांना सांगितले.

टॅग्स :Raju Timandeराजू तिमांडेDhananjay Mundeधनंजय मुंडे